Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: केजरीवालांचे लक्ष आता केंद्रातल्या राजकारणाकडे... (पहा Video)

वृत्तसंस्था

Arvind Kejriwal Reaction On Punjab Elections Results: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) मोठ्या विजयानंतर पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या पहिल्याच भाषणात केंद्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या भाषणात त्यांनी देशभरातील लोकांना आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. (Arvind Kejriwal Latest News)

आज आपच्या विजयानंतर बोलताना केजरीवाल म्हणाले, "तुम्हाला वाटेल आम्ही काय करू शकतो, सामान्य माणसाला वाटते की मी छोटा माणूस आहे, मी काय करू शकतो. चरणजीत चन्नी यांचा पराभव कोणी केला हे तुम्हाला माहीत आहे का? भदौर मतदारसंघातून आपचे उमेदवार लाभ सिंह विजयी झाले आहेत. लाभसिंग उगेके हे मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात काम करतात. त्यांचे वडील ड्रायव्हर तर आई सफाई कामगार आहे. लाभ सिंग हा फक्त 12वी पास आहे. लाभसिंग उगोके यांनी 2013 साली आम आदमी पार्टी (AAP) मध्ये स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. अशा व्यक्तीने चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पराभव केला आहे.''

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पराभवाबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, "आम आदमी पक्षाच्या (AAP) महिला स्वयंसेविका जीवनज्योत कौर यांनी सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांचा पराभव केला आहे. त्यांनी मजिठिया आणि सिद्धू या दोघांचाही पराभव केला आहे. मित्रांनो, सामान्य माणसाकडे खूप शक्ती असते. देशातील जनतेने त्यांची ताकद ओळखली पाहिजे. मला वाईट वाटत की, 75 वर्षे वाया घालवली, सर्वांनी आम आदमी पार्टीत सामील व्हावे,''

पहा व्हिडीओ-

"आज मी माझा लहान भाऊ भगवंत सिंग मान याला पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतो. आम्हाला इतके बहुमत मिळाले आहे की त्यावर विश्वास बसत नाही. जनतेचा विश्वास कायम ठेवायचा आहे. सेवा आणि प्रेमाचे राजकारण करायचे आहे. मी आत्ताच हनुमानजीच्या मंदिरातून आशीर्वाद घेऊन येत आहे. येणारा काळ भारताचा आहे, त्याला जगातील नंबर वन देश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही," असेही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, निकालांवरून दिसून येतंय की, लाभ सिंह यांना जवळपास 63000 मते मिळाली आहेत, तर सीएम चन्नी यांना जवळपास 26000 मते मिळाली आहेत. या आकडेवारीवरून आम आदमी पक्षाची लाट किती आहे, याचा अंदाज येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'

Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह रायगडला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा!

Raj Thackeray: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आता राणेंसाठी राज ठाकरे मैदानात!

Shantigiri Maharaj यांना शिंदे गटाकडून उमेदवारी?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT