arunachal pradesh mob lynching  Saam tv
देश विदेश

Shocking : हॉस्टेलमध्ये घुसून मुलींवर अत्याचार; आरोपी लोकांच्या तावडीत सापडला, पोलीस ठाण्यात हत्येचा थरार

arunachal pradesh mob lynching : हॉस्टेलमध्ये घुसून मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Arunachal Pradesh News: अरुणाचल प्रदेशच्या लोअर दिबांग घाटी जिल्ह्यातील रोइंग गावात ११ जुलै रोजी धक्कादायक घटना घडली. संतापलेल्या लोकांनी आरोपी युवकाला चोप देत हत्या केली आहे. रियाज उल कुरीम असे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रियाजवर हॉस्टेलमधील अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रियाज हा रोइंग येथील निर्माणाधीन इमारतीत मजुरी करायचा. तो नेहमी हॉस्टेल परिसरात जायचा. या हॉस्टेलमध्ये ६ ते ९ वर्षांच्या मुली राहत होत्या. या हॉस्टेलच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या देखील नव्हत्या. हॉस्टेलमधील खोल्यांना दरवाजा बंद करण्याची देखील कोणती सोय नसायची. याचा गैरफायदा घेऊन रियाज हॉस्टेलमध्ये घुसला होता . त्यानंतर त्याने हॉस्टेलमधील मुलींवर अत्याचार केला होता. या प्रकाराने परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

काय आहे प्रकरण?

हॉस्टेलमधील मुलींच्या तब्येत बिघडली. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झालं. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पीडित मुलींचे पालक आणि शिक्षकांची १० जुलै रोजी सायंकाळी बैठक झाली होती. मात्र, रात्री परिसरातील वातावरण चिघळलं. संतापलेल्या लोकांनी हॉस्टेलजवळी निर्माणाधीन इमारतीमधील मजुरांवर हल्ला केला. मात्र, त्या ठिकाणाहून रियाजने पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी रियाज लोकांना एका कॉलनीत सापडला. त्यानंतर त्याला लोकांनी चोप देण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणलं. मात्र, संतापलेले लोक पोलीस ठाण्यात घुसले. लोकांच्या मारहाणीत रियाजचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Risks: 'या' लोकांसाठी दूधाचे सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरते, कोणत्या लोकांनी पिणे टाळावे?

Maharashtra Live News Update: एक दिवसीय आंदोलन - नियमांचे पालन करावं; पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई

Manoj Jarange: गोळ्या घाला तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा|VIDEO

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, आंबिवलीजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकल खोळंबल्या

Eiffel Tower: पॅरिसच्या आयफेल टॉवरबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT