BJP Retain Power In Arunachal Pradesh Saam Tv
देश विदेश

Arunachal Election Result 2024: अरुणाचलमध्ये भाजपची सत्ता कायम, SKM ने बहुमताचा आकडा केला पार

BJP Retain Power In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार SKM ने बहुमताचा आकडा पार केला आहे.

Priya More

एक्झिट पोलने मोदी सरकार (Modi Government) ३.० स्थापनेचे संकेत दिल्यानंतर आता भाजपसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) लागेल. त्याआधी आज अरुणाचल प्रदेशातून भाजपला आनंदाची बातमी मिळाली आहे. अरुणाचलमध्ये भाजप (BJP) पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपने राज्यातील एकूण ६० जागांपैकी २४ जागा जिंकल्या असून २२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. याठिकाणी एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी सज्ज आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, पक्षाने 30 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपने आधीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाउना मीन हे आपआपल्या मतदारसंघातून आधीच विजयी झाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्ष अरुणाचल प्रदेशमध्ये ३० जागांवर आघाडीवर आहे, ज्यात लुमला, कलाक्तांग, कोलोरियांग, नाचो, लिकाबली, बसर, अलॉन्ग (पश्चिम), अलॉन्ग (पूर्व) आणि इतरांचा समावेश आहे. अरुणाचल विधानसभेत बहुमताचा आकडा ३१ आहे.

तर नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) ८ जागांवर, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) दोन जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) तीन जागांवर, काँग्रेस एक आणि अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासोबतच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या ६० जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अरुणाचल प्रदेशात ४१ जागा जिंकल्या. जनता दलला (युनायटेड) ७, नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) ५, काँग्रेसला ४ आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलला (पीपीए) १ जागा मिळाली. विधानसभा निवडणुकीतही दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचा एक आमदार, माजी मुख्यमंत्री नबाम तुकी वगळता सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पुन्हा एकदा सहज विजयाकडे वाटचाल करत आहे. पक्ष २९ जागांवर आघाडीवर आहे. विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) एका जागेवर पुढे आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत SKM ने १७ जागा जिंकल्या, तर SDF ने १५ जागा जिंकल्या. आताच्या आतापर्यंच्या निकालावरून अरुणाचल राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT