Avalanche Saam Tv
देश विदेश

Arunachal Pradesh: हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले; बचावकार्य सुरू

कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे (Indian Army) सात जवान अडकल्याचे वृत्त आहे.

वृत्तसंस्था

अरुणाचल प्रदेश: कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे (Indian Army) सात जवान अडकल्याचे वृत्त आहे. हिमस्खलनामुळे लष्कराच्या दलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे भारतीय लष्कराने माहिती दिली आहे. तसेच बचाव कार्यात (Rescue Operation) मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अती बर्फवृष्टीमुळे परिसरात वातावरण खराब झाले आहे.

शिवाय, हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. तसेच तेथे गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वृत्तानुसार, राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी बर्फ साचला आहे. या साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याचे वृत्त आहे. तसेच याठिकाणी वीज आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. या नैसर्गिक संकटाचा मात्र सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card: रेशन दुकानावर रेशन मिळत नाही? अशा पद्धतीने करा तक्रार

Maharashtra News Live Updates : आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा

History : अखेरची काळरात्र! विनाशकारी भोला चक्रीवादळ, ज्यात गेला होता ५ लाख लोकांचा जीव

Jharkhand Election: झारखंड विधानसभेसाठी आज मतदान, वायनाडसह ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वोटिंग

Viral Video: रॅगिंगचा विरोध! १०-१२ जणांनी हॉटेलामध्ये घुसून मारले, लाथा-बुक्क्यांनी चोपले, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT