8 वर्षांनंतर Google Chrome चा लोगो बदलणार; असे असेल नवीन रूप

Google Chrome चे डिझायनर Elvin Hu यांनी Twitter वर एका थ्रेडमध्ये लोगोच्या रीडिझाइनवर शेअर केली आहे.
Google Chrome New Logo
Google Chrome New LogoSaam Tv
Published On

Google Chrome New Logo: गुगल यावर्षी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये बरेच बदल करत आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की, गुगल 8 वर्षानंतर पहिल्यांदाच आपल्या क्रोममध्ये आपला लोगो बदलणार आहे. पण हा बदल पाहता तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. कारण गुगलने त्यात थोडा बदल केला आहे. क्रोमचा लोगो आधी 2008, 2011 आणि नंतर 2014 मध्ये बदलण्यात आला होता.

नवीन Google Chrome लोगो कसा दिसेल?

Google Chrome साठी डिझायनर Elvin Hu ने ट्विटरवर नवीन लोगोची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी क्रोमच्या जुन्या आणि नवीन लोगोमधील फरक दाखवला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'तुमच्यापैकी काहींना आज क्रोमच्या कॅनरी अपडेटमध्ये एक नवीन आयकॉन दिसला असेल. होय! आम्ही 8 वर्षांत प्रथमच Chrome चे ब्रँड आयकॉन अपडेट करत आहोत. लवकरच नवीन चिन्ह तुमच्या सर्व डिव्हायसेस दिसणार आहे.

फरक काय आहे?

गुगल क्रोमच्या नवीन लोगोबद्दल बोलायचे झाले तर, त्यात थोडा बदल दिसेल. जुन्या लोगोची ग्रीन सेंटरवर थोडी सावली होती, जी बदलानंतर काढून टाकण्यात आली आहे. नवीन लोगोमध्ये तुम्हाला लाल, पिवळे आणि हिरवे रंग अधिक स्पष्ट दिसतील. मध्यभागी असलेला निळा रंग आता पूर्वीपेक्षा जास्त गडद दिसतो. एकूणच Chrome मधील सर्व रंग आता पूर्वीपेक्षा गडद झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com