Anti Sikh Riots Case  saam tv
देश विदेश

Anti Sikh Riots Case: १९८४ च्या दंगली प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; बाप-लेकाला जाळून मारलं, ४१ वर्षानंतर निकाल

Anti Sikh Riots Case: जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची सरस्वती विहारमध्ये १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमारला आरोपी करण्यात आले होते.

Bharat Jadhav

1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. कुमार यांच्या शिक्षेवर18 फेब्रुवारीला वाद-विवाद होणार आहे. एक नोव्हेंबर 1984 दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार आरोपी होते. या प्रकरणात कोर्टाने आज निर्णय दिला.

काय आहे आरोप?

कोर्टाने आरोपी सज्जन कुमार यांच्याविरोधात IPC कलमान्वये 147/148/149/302/308/323/395/397/427/436/440 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेत. एसआयटीने सज्जन कुमार हे संतप्त जमावाचं नेतृत्त्व करत होते. त्यांना प्रेरित केल्यामुळे टोळक्याने दोन व्यक्तींना जिवंत पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घरातील वस्तू आणि संपत्तीचं नुकसान केलं होतं. घरातील वस्तूंची नासधूस केली.

संतप्त जमावाने पीडित लोकांचं घर पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घराच्यांनाही मारहाण केली होती. एक नोव्हेंबर 2023 रोजी कोर्टाने या प्रकरणी सज्जन कुमार यांचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी सज्जन कुमार यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT