Karnataka News In Marathi Twitter/@ANI
देश विदेश

कहरच! कर्ज न मिळाल्याने संतापलेल्या पठ्ठ्याने बँकेलाच दिले पेटवून

कर्नाटकात कर्ज न मिळाल्याने एका व्यक्तीने बँकेला आग लावली.

वृत्तसंस्था

बेंगळुरू : माणसाला हवे ते हवे तेव्हा मिळाले नाही तर, आजकाल कोण काय करेल ते सांगता येत नाही. असे अनेक प्रकार घडलेले आपण ऐकत असतो. पण एका पठ्ठ्याने चक्क बॅंकेने कर्ज देण्यास नकार दिला म्हणून बॅंकेलाच आग लावली आहे. होय! कर्नाटकात कर्ज न मिळाल्याने एका व्यक्तीने बँकेला आग लावली. हे प्रकरण हवेरी जिल्ह्यातील आहे. या व्यक्तीने अनेकवेळा बँकेत कर्जासाठी अर्ज केला, मात्र वारंवार नकार मिळाल्याने तो अस्वस्थ झाला. त्याला हा नकार इतका घृणास्पद वाटला की त्याने बँकेला आग लावली. वृत्तसंस्थेनुसार, हे प्रकरण रविवारी घडले. आग लावून टाकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला.

कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीने रविवारी हावेरी जिल्ह्यात बँकेला आग लावली."आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आयपीसीच्या कलम अंतर्गत कागिनेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे पोलिसांनी सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT