Chandrababu Naidu Arrested In Corruption Case Saamtv
देश विदेश

Chandrababu Naidu Arrest: पहाटे ३ वाजता मोठी कारवाई! आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; काय आहे प्रकरण?

Chandrababu Naidu Arrested In Corruption Case: तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना पहाटे नंद्याल जिल्ह्यातून अटक केली.

Gangappa Pujari

Chandrababu Naidu News: आंध्रप्रदेशच्या राजकारणात मध्यरात्री एक मोठी घडामोड समोर आली आहे. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना पोलिसांनी शनिवारी( ९, सप्टेंबर) पहाटे नंद्याल जिल्ह्यातून अटक केली. नायडू यांना कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पिता-पुत्रावर ही कारवाई केली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये (Skill Development Corporation) गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये नायडू यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे.

तसेच चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे. सध्या चंद्राबाबू नायडू नांदयाल दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आंध्रप्रदेशचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT