Andhra Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: पहाटे अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

Andhra Pradesh Bus Accident: आंध्रप्रदेशमध्ये पहाटे भयंकर रस्ते अपघात झाला. ३७ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Priya More

Summary -

  • आंध्र प्रदेशमध्ये बसला भीषण अपगात

  • अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळली

  • अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले

  • बसमध्ये ३७ प्रवासी होते

आंध्र प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. प्रवासी बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णलयात दाखल केले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चित्तूर-मर्दुमल्ली महामार्गावरील घाटात खासगी बस दरीत कोसळली. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली बस खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला त्यावेळी बसमधील प्रवाशांना झोप लागली होती. त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

या बसमधून एकूण ३७ प्रवासी प्रवास करत होते. ही बस तेलंगणातील भद्राचलम येथून अन्नावरमकडे जात होती. अपघात तुलसीपाकालु गावाजवळ झाला. या भागात अरुंद आणि वळणाचा रस्ता असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दरीत कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. चिंतूर पोलिस, बचाव पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना भद्राचलम क्षेत्र रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. काही मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली ​​आहे. अपघाताच्या बातमीने भद्राचलम आणि एएसआर जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Ladki Bahin Yojana: eKYC करुनही २४ लाख लाडक्या बहि‍णींना डिसेंबरचे ₹१५०० आलेच नाहीत; कारण काय?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्षांना इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

Todays Horoscope: आज तुम्ही लपवून ठेवलेल्या गोष्टी सर्वांसमोर येऊ शकतात, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT