Andhra Pradesh Accident Saamtv
देश विदेश

Andhra Pradesh Accident: दोन ट्रक, बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू; २० जखमी

Accident News: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

Andhra Pradesh Accident:

आंध्रप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यामध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नेल्लोर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 2 वाजता श्रीकालहस्तीकडे जाणाऱ्या दोन बैलांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला लोखंडी वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

अपघातानंतर लोखंड घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे गाडीवरील सुटले आणि थेट पलिकडून येणाऱ्या एका खासगी बसला धडक दिली. या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काश्मिरमध्ये अपघात...

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात कार आणि ट्रकमध्ये अपघात झाल्याचीही मोठी घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील टिकरीजवळ हा अपघात झाला. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी कुडाळमध्ये जय्यत तयारी

Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या

SCROLL FOR NEXT