Accident News Saam TV
देश विदेश

CCTV Footage : आंध्र प्रदेशात शाळकरी मुलांच्या रिक्षाची भरधाव ट्रकला धडक, ८ विद्यार्थी गंभीर जखमी

Accident News : अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलांना रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्रविण वाकचौरे

Accident News :

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघात आठ लहान मुले जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील संगम सैराट चित्रपटगृहाजवळ आज सकाळी शाळेत जात असताना ऑटो-रिक्षा आणि लॉरी ट्रकची धडक झाली. ज्यामध्ये आठ शाळकरी मुले जखमी झाली.  (Latest Marathi News)

प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी झाली, त्यात मुले जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलांना रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्हीतील दृष्यांनुसार, एक ट्रक वेगाने रस्त्यावरुन धावत येताना दिसत आहे. दरम्यान एक रिक्षा अचानक येते आणि ट्रकला धडकडे. धडकेनंतर काही क्षणात रिक्षात बसलेली मुले रस्त्यावर पडतात. यात आठ मुले जखमी झाले आहेत. रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर काढा; शिवरायांच्या पुतळ्यावरून माढ्यात राडा|VIDEO

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! आता दिवा स्थानकातून सुटणार पॅसेंजर; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अंजनगावातील खेलोबा मंदिरात पोलिसांची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! माजी मंत्री बच्चू कडूंवर भाजप आमदारच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा

SCROLL FOR NEXT