YS Sharmila joins Congress Saam Tv
देश विदेश

Andhra Pradesh Political News : आंध्रप्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग; वायएस शर्मिला यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश

YS Sharmila joins Congress : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळं कॉंग्रेस पक्षाला नवं बळ मिळाल्याचं दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Andhra CMs sister YS Sharmila joins Congress

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. वायएसआर तेलंगणा पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची धाकटी बहीण वायएस शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केलाय. त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. (latest political news)

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालाय.

वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला खूप आनंद झाला असेल की त्यांच्या मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मी काँग्रेसमध्ये राहून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेन, असं शर्मिला यांनी म्हटलंय (Andhra CM Jagan Mohan reddy).

आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शर्मिला (YS Sharmila) पक्षात सामील झाल्या आहेत. त्यामुळं दक्षिणेत तेलंगणा नंतर आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शर्मिला रेड्डी यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

महत्त्वाची भूमिका देण्याची शक्यता

काँग्रेस हायकमांड शर्मिला यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तसंच आंध्र प्रदेशातही महत्त्वाची भूमिका देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काँग्रेस (congress) पक्षात त्यांना सरचिटणीसपद दिलं जाण्याची शक्यता वर्तविली जातेय. त्यांचा हा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra Live News Update: देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT