Flare from offshore drilling site near Andaman Islands marks a major natural gas discovery by Oil India. Saam tv
देश विदेश

अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा खजिना मिळाला! केंद्र सरकारकडून व्हिडीओ शेअर; भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ

Natural Gas Discovery Near Andaman Nicobar Islands India: अंदमान-निकोबार परिसरात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडच्या या शोधामुळे भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाला मोठा हातभार लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

अंदमान-निकोबार परिसरात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सरकारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) ने अंदमानच्या बेटांमध्ये नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधून काढला आहे. या शोधामुळे भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

पुरी यांनी ‘एक्स’ (Twitter) वर पोस्ट करत सांगितले की, अंदमान-निकोबार द्वीपसमूहापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम-3 या ठिकाणी हा साठा सापडला आहे. ही विहीर सुमारे 1900 मीटर खोल पाण्यात आहे. सुरुवातीच्या चाचण्यांदरम्यान सतत जळणाऱ्या गॅसमुळे समजल्याचे बोलले जात आहे. गॅसचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यापूर्वीही 2025 मध्ये या परिसरात नैसर्गिक वायूचे साठे सापडले होते. श्री विजयपुरम-2 विहिरीत मिळालेल्या गॅसमध्ये सुमारे 87 टक्के मिथेन आढळले होते. सलग दोन ठिकाणी गॅस सापडल्यामुळे या संपूर्ण बेसिनमध्ये पेट्रोलियम घटक मोठ्या प्रमाणात असल्याचे संकेत मिळत आहेत. हा बेसिन इंडोनेशिया ते म्यानमारपर्यंत पसरलेला आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जा संकटाचा विचार करून भारत सरकारने समुद्रातील ऊर्जा स्रोतांचा शोध घेण्यावर भर दिला आहे. यासाठी ‘समुद्र मंथन’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विशेषतः अंदमान-निकोबार परिसरात संशोधन सुरू आहे. भूवैज्ञानिकदृष्ट्या हा भाग बंगाल-अराकान पेट्रोलियम प्रणाली’चा भाग मानला जातो. याच पट्ट्यात म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशिया येथे मोठे तेल आणि वायू साठे आढळले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, अंदमान परिसरात आणखी मोठे तेल आणि वायू साठे सापडण्याची शक्यता आहे. हे साठे प्रत्यक्षात समोर आल्यास जागतिक ऊर्जा क्षेत्रात भारताची भूमिका अधिक बळकट होऊ शकते. मात्र, या साठ्यांचा नेमका आकार आणि व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT