Anand Mahindra asked Nitin Gadkari can we do it saam tv
देश विदेश

Anand Mahindra Tweet: नदीखालून रस्ता जाणार? आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ ट्वीट करून थेट नितीन गडकरींना विचारला सवाल

Anand Mahindra asked Nitin Gadkari can we do it: आनंद महिंद्रा यांनी थेट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना हा व्हिडिओ टॅग करून प्रश्न विचारला आहे.

Chandrakant Jagtap

Anand Mahindra Video: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Mahindra Group Chairman Anand Mahindra) अनेकदा त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते सतत अॅक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा यांनी सोमवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक नदी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. या व्हिडिओचे दृश्य खूपच सुंदर दिसतंय. आनंद महिंद्रा यांनी थेट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना हा व्हिडिओ टॅग करून प्रश्न विचारला आहे.

व्हिडिओत दिसतंय सुंदर दृश्य

आनंद महिंद्रा यांनी 12 जून रोजी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर 6 सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. या व्हिडिओथ अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता एका रस्त्यावरून वाहने जात आहेत आणि पुलावरून नदी वाहत आहे. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे उभी आहेत. व्हिडिओमधील हे दृष्य खूप सुंदर दिसत आहे.

थेट नितीन गडकरींना विचारला प्रश्न

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Wait…What? नितीन गडकरीजी आपणही असे करू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

गडकरींच्या उत्तराची प्रतीक्षा

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांचे मत व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ लिहेपर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर ट्विटर युजर्सही जबरदस्त रिप्लाय देत आहेत. मात्र नितीन गडकरी यावर काय उत्तर देतात याची युजर्स वाट पाहत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT