Accident News  x
देश विदेश

Accident : होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, रोलर कोस्टरची राईड करताना आक्रित घडलं, स्टॅण्ड तुटलं अन् डोळ्यासमोर सारं संपलं

Accident News : लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्यासह बाहेर वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. रोलर कोस्टर राईडवर ही तरुणी बसलेली असताना राईडचा स्टँड तुटला आणि तरुणी खाली पडली.

Yash Shirke

लग्नाच्या आधी भावी पतीसोबत वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. वॉटर पार्कमधील रोलर कोस्टरचा स्विंग तुटल्याने या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना दिल्लीच्या कापसहेडा परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांद्वारे या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मृत तरुणीचे नाव प्रियंका (वय २४) असे आहे. तिच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका नजफगडच्या निखिलशी फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार होती. गुरुवारी (३ एप्रिल) रोजी निखिलचा प्रियंकाला फोन आला आणि दोघांनी मिळून वॉटर पार्कला जाण्याचा प्लान केला. दुपारी एकच्या सुमारास दोघे कापसहेडाजवळच्या फन अँड फूड विलेजला गेले. त्यानंतर राइड एम्यूजमेंट पार्कमध्ये त्यांनी प्रवेश केला.

रोलर कोस्टरचा राईड ज्या वेळेस वरच्या दिशेला गेली, तेव्हा त्याचा स्टँड तुटला. स्विंग तुटल्यावर रोलर कोस्टरवरुन प्रियंका जोरात खाली पडली. ती गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाचा प्रियंकाचा मृत्यू झाला. निखिलने प्रियंकाच्या घरच्यांना आणि पोलिसांनी संपर्क केला.

प्रियांका पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, त्यातच तिचा मृत्यू झाला. मोहितने आरोप केला की प्रियंकाच्या मृत्यूनंतर वॉटर पार्कचा एक भाग, ज्यामध्ये रोलर कोस्टर देखील आहे, दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. जर रोलर कोस्टर राइडची दुरुस्ती सुरु होती, तर ते वापरण्यासाठी का खुले करण्यात आले. अशा परिस्थिती लोकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचे मोहितने म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT