Punjab Police  Saam Tv
देश विदेश

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Punjab Police: पंजाबमध्ये पोलिस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री गस्तीवर असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मानेला गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Priya More
  • अमृतसरमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या

  • एएसआय हरजीत सिंग यांची अमृतसरमध्ये निर्घृण हत्या

  • पंजाबमध्ये रात्री गस्त घालताना पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार

  • अमृतसरच्या धान्य बाजाराजवळ घडली घटना

पंजाबच्या अमृतसरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. ड्युटीवर तैनात असलेल्या एएसआयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हरजीत सिंग असं हत्या झालेल्या एएसआयचे नाव होते. अमृतसरच्या हकीमा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही हत्याकांडाची घटना घडली. या घटनेमुळे पंजाब हादरले आहे. या हल्ल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

एएसआय हरजीत सिंग हे दुचाकीवरून गस्त घालत होते. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना अमृतसरमधील एका रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. एएसआय हरजीत सिंग हे हकीमा पोलिस ठाण्यात तैनात होते. या घटनेची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पण पोलिसांनी अद्याप या घटनेला दुजोरा दिला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार आणि शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास गेट हकिमा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ते ड्युटीवर तैनात होते. धान्य बाजाराजवळ ते दुचाकीवरून गस्त घालत होते. त्याचवेळी धान्य बाजाराच्या गेट क्रमांक २ बाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हरजीत सिंग यांच्या मानेला गोळी लागली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर अवस्थेत हरजीत सिंग यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

पोलिस आता हल्लेखोरांची ओळख पटवून घटनेमागील सूत्रे एकत्र जोडण्याचे काम करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा वापर केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यावर हल्ल्यामागील हेतू आणि आरोपींची ओळख स्पष्ट होईल. या हल्ल्यानंतर, 'तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान' नावाच्या संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमृतसरमध्ये यापूर्वीही पोलिसांना लक्ष्य करण्यात आले आहे. याआधी देखील एसआय जोग सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT