Amit Shah Questions of Satya Pal Malik Saam Tv
देश विदेश

Amit Shah On Satya Pal Malik : राज्यपाल असताना सत्यपाल मलिक गप्प का बसले? अमित शहांचा थेट सवाल

Amit Shah Questions of Satya Pal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतेच पुलवामा हल्ल्यासंदर्भात आणि इतर मुद्द्यांवर गौप्यस्फोट केले होते.

Nandkumar Joshi

Amit Shah Questions of Satya Pal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतेच पुलवामा हल्ल्यासंदर्भात आणि इतर मुद्द्यांवर गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर अमित शहा यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी मलिक यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  (Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सत्यपाल मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमात अमित शहांनी सत्यपाल मलिकांच्या दाव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्यपाल मलिक यांची वक्तव्ये आमची साथ सोडल्यावरच का आली आहेत? सत्तेत असताना त्यांचा अंतरात्मा जागृत का नाही झाला, असा सवालही त्यांनी केला.

अमित शहांनी यावेळी सत्यपाल मलिक यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित केला. सत्यपाल मलिक यांनी जो दावा केला आहे, तो खरा आहे तर मग ते राज्यपाल असताना गप्प का बसले? राज्यपालपदावर असताना त्यांनी या विषयावर बोलायला हवे होते. पण असो हे सार्वजनिक चर्चा करण्यासारखे विषय नाहीत, असे अमित शहा म्हणाले.

'जनतेला मूल्यांकन करायला हवे'

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकारने असं काही केलं नाही की जे लपवायला लागेल हे मी देशातील जनतेला निश्चितपणे सांगू इच्छितो. कुणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आमच्यापासून दूर होऊन काही बोलत असेल तर, मीडिया आणि जनतेनेही त्याचे मूल्यांकन करायला हवे, असे अमित शहा म्हणाले.

कर्नाटकात विजयाचा विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने केलेली जनकल्याणाची कामे आणि योजनांवर प्रकाश टाकला. यावेळी अमित शहांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारवरही निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT