Amit Shah in Jharkhand Election saam tv
देश विदेश

Amit Shah : खटाखट आश्वासनं देऊन विदेशात जातात; अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Amit Shah on Rahul Gandhi : झारखंडच्या मधुपूरमध्ये अमित शहांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी खटाखट आश्वासनं देऊन विदेशात जातात ते लवकर परत येतच नाहीत, अशी टीका शहा यांनी केली.

Nandkumar Joshi

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी झारखंडमध्ये मधुपूरच्या एका प्रचारसभेला संबोधित केलं. राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. हे दोन्ही पक्ष घुसखोरांना प्रोत्साहन आणि त्यांचा बचाव करत असल्याचा गंभीर आरोप शहा यांनी केला.

एकदा भाजपचं सरकार आणा मग या घुसखोरांना शोधून काढणार, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला. जोपर्यंत विधानसभेत भाजपचा आमदार आणि संसदेत भाजपचा खासदार आहे, तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही, असा पुनरुच्चारही अमित शहांनी यावेळी केला.

घुसखोरीच्या मुद्द्यावरून निशाणा

मी आलोय तर सर्वात आधी घुसखोरीवर बोलणार आहे. हे घुसखोर आदिवासी बहिणींसोबत तिसरं-चौथं लग्न करतात आणि त्यांच्या जमिनी लाटतात. गुन्हेगारी वाढते आणि तुमचा रोजगारही हिसकावून घेतात. घुसखोरी फक्त आदिवासींची समस्या नाहीत, तर येथील प्रत्येक तरुणाची समस्या आहे. हेमंत सोरेन आणि काँग्रेस या घुसखोरांना रोखण्याऐवजी आपली व्होटबँक मानतात. एकदा का भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार येऊ द्या, मग एकेकाला शोधून काढतो, असा इशाराही अमित शहांनी प्रचारसभेत दिला.

राहुल गांधींवर टीकास्त्र

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे आश्वासने देऊन परदेशात पळून जातात. भाजपच असा पक्ष आहे, जो दिलेली गॅरंटी पूर्ण करतो, असं अमित शहांनी ठामपणे सांगितले.

अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कार्यकर्त्यांना म्हणाले की, आश्वासने अशी द्या की ते पूर्ण केले पाहिजेत. हे असं का बोलावं लागलं. कारण त्यांनी कर्नाटकात आश्वासने दिली, तेलंगणात आश्वासने दिली. पण ती पूर्ण करू शकले नाहीत. हे राहुल गांधी आहेत. आश्वासने देऊन निघून जातात. खटाखट, फटाफट आश्वासने देतात आणि पुन्हा येत नाहीत. परदेशात निघून जातात. पण तुम्हाला ठाऊक आहे की मोदींनी दिलेली आश्वासने म्हणजे दगडावरची रेघ आहे, असेही शहा म्हणाले.

जेव्हा घुसखोर गावात येतात, तेव्हा तुमचा तलाठी काय करतो, पोलीस काय करतात? यांना रेशन कार्ड कोण देतं? आदिवासी मुलींच्या जमिनी यांच्या नावावर कोण करून देतं? हेमंत सोरेन यांची उलटगणती सुरू झाली आहे. घुसखोरांनो, २३ तारखेपर्यंत मजा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असंही अमित शहा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT