America Tragic Plane Crash Saam
देश विदेश

एअरपोर्टवर २ विमानांची टक्कर, क्षणात आगीचे लोट उठले, ९ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

America Tragic Plane Crash: कोलोरॅडोतील फोर्ट मॉर्गन म्युनिसिपल विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली. अपघातानंतर विमानांना आग लागली व ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Bhagyashree Kamble

  • कोलोरॅडोतील फोर्ट मॉर्गन म्युनिसिपल विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली.

  • अपघातानंतर विमानांना आग लागली व ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

  • अपघात एटीसी टॉवरच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • NTSB आणि FAA यांनी अपघाताच्या तपासाला सुरूवात केली आहे.

अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात भीषण विमान अपघात घडला आहे. फोर्ट मॉर्गन म्युनिसिपल विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली. टक्कर होताच दोन्ही विमानांना आग लागली आणि विमानं खाली कोसळली. विमान अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पण अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मॉर्गन काउंटी शेरिफ कार्यालयाने विमान अपघाताची माहिती दिली आहे.

मॉर्गन काउंटी शेरिफ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी कोलोरॅडोमधील फोर्ट मॉर्गन म्युनिसिपल विमानतळाजवळ हा अपघात झाला. दोन्ही विमाने एकमेकांना ओलांडताना अचानक आदळली.

मॉर्गन विमानतळाच्या एटीसी टॉवरवर बसवलेल्या कॅमेऱ्यात विमान अपघात कैद झाला आहे. ज्याची क्लिप पोलीस आणि माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दुरवरून काळ्या धुराचे लोट दिसत आहे. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएससी) आणि संघीय विमान प्रशासन यांनी विमान अपघाताच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

जानेवारी २०२५ मध्येही अशा प्रकारचा अपघात घडला होता

२९ जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेतही अशाच प्रकारची २ विमानांची टक्कर झाली होती. अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ५२४२चे बॉम्बार्डियर सीआरजी७०० विमान युनायटेड स्टेट्स आर्मी सिकोर्स्की यु-एच ६० ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी टक्कर झाली होती. टक्कर होताच दोन्ही विमानांना आग लागली होती. पोटोमॅक नदीवर आकाशात दोन्ही विमाने टक्कर झाली. या अपघातात ६७ जणांना जीव गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT