School Church Attack Saam Tv News
देश विदेश

शाळेत रक्तरंजित थरार; प्रार्थना सुरू असताना अंदाधुंद गोळीबार; २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ गंभीर

School Church Attack: मिनियापोलिसमध्ये शाळा व चर्चवर गोळीबार, २ मुलांचा मृत्यू. १७ जण जखमी, त्यापैकी १४ मुलं; सात मुलांची प्रकृती गंभीर. आरोपी २० वर्षीय युवक, गोळीबारानंतर आत्महत्या केली.

Bhagyashree Kamble

  • मिनियापोलिसमध्ये शाळा व चर्चवर गोळीबार, २ मुलांचा मृत्यू.

  • १७ जण जखमी, त्यापैकी १४ मुलं; सात मुलांची प्रकृती गंभीर.

  • आरोपी २० वर्षीय युवक, गोळीबारानंतर आत्महत्या केली.

  • एफबीआय तपास सुरू, अमेरिकन नेत्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला.

बुधवारी सकाळी अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका शाळेत गोळीबाराचा प्रकार घडला. एका बंदुकधारीने अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन मुलांचा मृत्यू झाला. तर, १७ लोक जखमी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत गोळीबार केल्यानंतर बंदुकधारीने स्वत:वर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेली दोन्ही निष्पाप मुले ८ आणि १० वर्षांची आहेत.

हा हल्ला अॅन्युनसिएशन चर्चमध्ये झाला. इथे एक ग्रामर स्कूल देखील आहे. रूग्णालयातील अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा भ्याड हल्ला बंदुकधारीने शाळेच्या परिसरात केला. यात १७ मुलं जखमी झाले आहेत. १७ जखमींपैकी १४ मुले आहेत. त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर होती. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिनियापोलिसचे पोलीस प्रमुख ब्रायन ओ'हारा म्हणाले की, आरोपी २० वर्षांचा असून, या बंदूकधारी व्यक्तीतडे रायफल, शॉटगन आणि पिस्तूल होती. संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस प्रमुखांनी सांगितले की, गोळीबार करणारा व्यक्ती चर्चजवळील शाळेजवळ आला. नंतर चर्चच्या खिडकीच्या आत रायफलमधून गोळीबार केला.

काही विद्यार्थी प्रार्थना करायला बसले होते. मुलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. संशयिकानं इमारतीच्या आत बसलेल्या मुलांवर आणि भाविकांवर गोळ्या झाडल्या. नंतर फरार झाला. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 'दु:खद घटना अतिशय भयानक आहे. गोळीबाराबाबत माहिती मिळाली. व्हाईट हाऊस या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे', असं ट्रम्प म्हणाले.

मिनियापोलिसचे महापौर जेकब फ्रे यांनी देखील घटनेचा निषेध व्यक्त करताना सांगितले की, 'मुलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुलांनी भीतीशिवाय शाळा किंवा चर्चमध्ये जायला हवे. त्यांना हिंसाचाराचा धोका नको', असं ते म्हणाले. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत'.

एफबीआयची प्रतिक्रिया

एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की, एजन्सीचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, सर्व तपास सुरू आहे. पुढील माहिती लवकरच देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT