American Mall Shooting Saam TV
देश विदेश

America Mall Shooting : अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, एका भारतीय तरुणीसह ९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, एका भारतीय तरुणीसह ९ जणांचा मृत्यू

Satish Kengar

American Mall Shooting : अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. अशातच पुन्हा एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात ही घटना घडली असून यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एका भारतीय तरुणीचाही मुलीचाही मृत्यू झाला.

American Mall Shooting : हैदराबाद येथील होतो मृत तरुणी

मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात हैदराबादमधील २७ वर्षीय तेलुगू तरुणी ऐश्वर्या टाटिकोंडा हिचाही मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या ही तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील न्यायाधीश टाटिकोंडा नरसी रेड्डी यांची मुलगी आहे. ऐश्वर्या अमेरिकेतील एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे वृत्त आहे. ऐश्वर्याचे पार्थिव घरी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  (Latest Marathi News)

American Mall Shooting : हल्लेखोराला पोलिसांनी केलं ठार

शनिवारी दुपारी ३.३० वाजता अॅलन प्रीमियम आउटलेट्समध्ये गोळीबाराची घटना घडली. याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बंदुकधारी व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. मॉरिसियो गार्सिया नावाच्या 33 वर्षीय व्यक्तीने ही घटना घडवून आणली.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि बंदूकधारी व्यक्त्तीवर गोळीबार करत त्याला ठार केलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या ५ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू असल्याचे डॅलस रुग्णालयाने सांगितले. गोळीबारात जखमी झालेल्या ७ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT