हवाई प्रवास जो आजवर सर्वात सुरक्षित मानला जात होता, तोच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचं चित्र आहे. २०२५ या वर्षातील पहिल्या सात महिन्यांत विविध विमान अपघातांमध्ये तब्बल ४९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज सरासरी २ हून अधिक जणांचा विमानप्रवासात मृत्यू होत असल्याची माहिती आहे.
भारतापासून रशियापर्यंत, ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत प्रत्येक देशात हवाई अपघातांमध्ये वाढ झाली आहे. IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रॅफिक असोसिएशनच्या मते, २०१९ ते २४ जुलै या कालावधीत विमान अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या १०९९ आहे. त्यापैकी या वर्षी ४९९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या वर्षी २४४ जणांनी आपले प्राण गमावले होते. परंतु या वर्षी फक्त ७ महिन्यांत मृतांचा आकडा दुप्पट झाला आहे.
रशिया विमान अपघात
गुरूवारी रशियामध्ये अंगारा एअरलाइन्सचं एक विमान कोसळलं होतं. या विमानात ४९ प्रवासी होते आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात वर्षातील भीषण दुर्घटनांपैकी एक मानला जात आहे.
अहमदाबाद विमान अपघात
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला.अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळलं. विमानात एकूण २४० प्रवासी होते. अपघातात केवळ एक व्यक्ती वाचली, तर एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला.
या वर्षातील भीषण विमान अपघात: -
२९ जानेवारी – अमेरिका: अमेरिकन एअरलाइन्सचं विमान वॉशिंग्टनजवळ लष्करी हेलिकॉप्टरला धडकलं; ६७ जणांचा मृत्यू
२९ जानेवारी – सुदान: चार्टर विमान कोसळलं; २० जण ठार
३० जानेवारी – अमेरिका: फिलाडेल्फियामध्ये एअर अॅम्ब्युलन्स अपघात; ८ जणांचा मृत्यू
७ फेब्रुवारी – अलास्का: बेपत्ता झालेलं विमान; १० मृत्यू
होंडुरास: चार्टर विमान समुद्रात कोसळलं; १३ जणांचा मृत्यू
१० एप्रिल – न्यू जर्सी: हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळलं; ५ प्रवासी ठार
३ मे – सुदान: बोईंग ७३७ मालवाहू विमान पाडलं गेलं; २० मृत्यू
२२ मे – सॅन दिएगो: लष्करी विमान कोसळलं; ६ जण मृत
२१ जुलै – बांगलादेश (ढाका): लढाऊ विमान इमारतीवर आदळलं; २९ जणांचा मृत्यू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.