Air India Phuket-Delhi Flight Hit by Turbulence AI Photo
देश विदेश

Air India : विमान हवेतच थांबलं अन् उलटे फिरले, दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा थरार; नेमकं झालं काय?

Air India Latest News : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला हवेत तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या घटनेत १० प्रवासी आणि २ क्रू सदस्य जखमी झाले असून विमान दिल्लीत सुरक्षित उतरले.

Namdeo Kumbhar

Air India Flight AI2379 Encounters Mid-Air Turbulence : थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत असताना अचानक जोरदार धक्का (Turbulence) बसला. हवेच्या प्रचंड दाबाने काही क्षणांसाठी विमान अचानक खाली आल्यामुळे विमानात तुफान गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवासी व केबिन क्रू असे मिळून १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

फुकेत (थायलंड) हून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI2379' या विमानाला हवेत जोरात झटके (Turbulence) बसले. हवेच्या दाबामुळे काही क्षणांसाठी विमान ठरावीक उंचीपेक्षा खाली आले होते. पण वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. एअर इंडियाने या घटनेची पुष्टी केली असून, सर्व प्रवाशांची सुरक्षा हेच आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

अचानक विमान हवेतच थांबलं अन्

एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानातील एका प्रवाशाने हवेत झालेल्या त्या थरारक घटनेचा अंगावर काटा आणणारा अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितला. विमानात दोन ते तीन मिनिटे जोरदार हेलकावे बसत होते. आम्ही एअर इंडियाविरुद्ध १००% कारवाई करू, असे एका प्रवाशाने ANI ला प्रतिक्रिया दिली.

विमानाने उड्डाण करून साधारण दीड तास झाला होता. पहाटेची वेळ असल्याने आम्ही सगळे झोपेत होतो. अचानक चालत असलेले विमान थांबले आणि हवेतच उलटे झाले. २ ते ३ मिनिटे विमानात हा प्रकार सुरू होता, असे प्रवाशाने सांगितले. विमानात १०० हून अधिक लोक होते आणि त्यापैकी जवळपास ७० ते ८० टक्के लोक यात दुखापतग्रस्त झाले आहेत. १५ ते २० प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या संपूर्ण निष्काळजीपणाबद्दल आम्ही एअर इंडियावर १००% कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे प्रवाशाने सांगितले.

एअर इंडियाने नेमकं काय म्हटले?

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून किरकोळ दुखापत झालेल्यांवर उपचार करण्यात आले. सर्व जखमींना एअर इंडियाच्या ग्राउंड टीमने तातडीने विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व आरोग्य हेच एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बाधित प्रवाशांना सर्व आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. या घटनेच्या तपासासाठी संबंधित सर्व प्रशासकीय आणि नागरी उड्डाण अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे आमदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला

High Court: ट्रेनमध्ये महिलेवरील सामूहिक बलात्काराला रेल्वे जबाबदार, पीडितेला ३ लाख रुपये देण्याचे हायकोर्टाचे आदेश

Night Mopping : रात्री घरात लादी पुसणं योग्य की अयोग्य? स्वच्छता तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा...

सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राजकारण तापले; NCP कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले, VIDEO

Shakira: फेमस पॉप क्वीन शकिरा भारत दौऱ्यावर? मुंबईसह पुण्यात लवकरच रंगणार म्युझिकल कॉन्सर्ट

SCROLL FOR NEXT