Air India Saam Tv
देश विदेश

बापरे! एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेताच २० मिनिटांत हवेतच इंजिन पडलं बंद

गुरुवारी अन्य विमानानं प्रवाशांना बेंगळुरूला रवाना करण्यात आलं, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

साम वृत्तसंथा

मुंबई: एअर इंडियाच्या ए ३२० (Air India) नियो विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या २७ मिनिटांनंतर मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. तांत्रिक बिघाडामुळं हवेतच असताना विमानाचं इंजिन बंद पडलं. त्यामुळं तातडीने मुंबई विमानतळावर विमान उतरावावं लागलं. शुक्रवारी ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गुरुवारी अन्य विमानानं प्रवाशांना बेंगळुरूला रवाना करण्यात आलं, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. एअर इंडियाच्या ए ३२० नियो (Air India) या विमानांमध्ये सीएफएमचे लीप इंजिन असतात. ए ३२० नियो विमानाच्या पायलटला सकाळी ९.४३ मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर काही मिनिटांनंतर लगेच एका इंजिनात बिघाड झाल्याची माहिती मिळाली.

सूत्रांनी सांगितले की, इंजिन बंद पडल्यानंतर सकाळी १०.१० मिनिटांनी पुन्हा मुंबई विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'एअर इंडिया सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आमचे पायलट अशी परिस्थिती उद्भवली तर, तिला सामोरे जाण्यास तयार असतात. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्ती टीमने तातडीने तपासणी सुरू केली आहे.' प्रवाशांना अन्य विमानाने बेंगळुरूकडे रवाना करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT