देश विदेश

Crime News: मैत्रीत धोका! दोस्ताच्या बायकोचे अश्लील AI व्हिडिओ तयार केले, ब्लॅकमेल करून महिलेवर केला बलात्कार

Delhi Crime News: दिल्ली लाहोरी गेटमध्ये एका पुरूषाने AI वापरून महिलेचे अश्लील फोटो बनवले. तिच्यावर बलात्कार केला आणि लाखो रुपये उकळले. फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार केली.

Dhanshri Shintre

  • लाहोरी गेट, दिल्ली येथे AIचा गैरवापर करून महिलेला ब्लॅकमेल आणि बलात्कार करण्यात आला.

  • आरोपीने आक्षेपार्ह एआय फोटो-व्हिडिओ तयार करून सतत लैंगिक अत्याचार केले.

  • पीडितेकडून आरोपीने लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले.

  • तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप अटक झालेली नाही.

दिल्लीतील लाहोरी गेट परिसरात घडलेल्या एका गंभीर प्रकरणाने परिसर हादरला आहे. एका महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल करत सांगितले की तिच्या पतीचा मित्र अनीस सिद्दीकीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) चा गैरवापर करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. त्यांचा आधार घेत ब्लॅकमेल केले आणि वारंवार तिच्यावर बलात्कार केला. या घटनेत आरोपीसोबत त्याची आई आणि बहीणही सहभागी असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

३० वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासोबत लाहोरी गेट परिसरात राहते. तिचा पती सुकामेव्याचा व्यवसाय करतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनीसने तिच्यासोबत काढलेला फोटो घेतला आणि त्याचा वापर करून आक्षेपार्ह एआय फोटो आणि व्हिडिओ तयार केले. यावर्षी जून महिन्यात, जेव्हा तिचा पती घरी नव्हता, तेव्हा अनीसने पीडितेला हे फोटो दाखवून धमकी दिली की ते व्हायरल करून तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करेल. त्याने घटस्फोटाचा धाक दाखवला आणि तिला ब्लॅकमेल करत बलात्कार केला.

AI चा गैरवापर

महिलेच्या मते, आरोपीची आई व बहीणही या ब्लॅकमेल आणि जबरी कृत्यात सहभागी होत्या. सततच्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी तिने आरोपीला पाच लाख रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. मात्र इतक्यावरही अनीस थांबला नाही. सप्टेंबर महिन्यात त्याने पुन्हा तिचे एआय बनवलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

पीडितेच्या पतीला तिचे आक्षेपार्ह फोटो मिळाल्यानंतर त्याने चौकशी केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या पतीच्या मदतीने तिने धैर्य गोळा करून पोलिसांत एफआयआर(FIR) दाखल केला. सध्या या प्रकरणाचा तपास एसआय अवंती राणी यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तथापि, अद्याप आरोपी व त्याच्या कुटुंबातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत आणि त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धाराशिव साबळेवाडी पाझर तलाव फुटला, शेतकऱ्यांचा मोठा फटका|VIDEO

Aishwarya Narkar Dance: 5 लाख फॉलोअर्स पूर्ण, ऐश्वर्या नारकर यांचा आनंद गगनात मावेना, सुंदरी गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

मराठीचा आग्रह असणाऱ्या मनसे नेत्याच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी; भाजपकडून ट्रोल | VIDEO

Flaxseed Benefits: अळशीचे सेवन केल्याने आरोग्यास काय फायदे होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT