AI transformation reshapes hiring trends as major IT firms like TCS signal slowdown in recruitment. saam tv
देश विदेश

आता नोकऱ्या कमी होणार? TCSमध्ये AIचा वापर वाढवला

TCS Pushes AI Adoption: महागाई वाढतेय तसा आपला पगारही वाढेल... असं म्हणत असाल तर आत्ताच सावध व्हा...नोकरी स्विच करणार असाल तर जरा थांबाच.... हे आम्ही का म्हणतोय ? यासाठी पाहा हा रिपोर्ट...

Saam Tv

शामल भंडारे, साम टीव्ही

एआयमुळे दिवसेंदिवस नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळतीय. सर्वात मोठं संकट हे आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांवर निर्माण झालंय. यात आता आणखी एक कंपनीची भर पडलीय. आणि ती आहे भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनींपैकी एक असलेली TCS....TCSचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी तसे थेट संकेतच दिले आहेत. टीसीएसमध्ये कर्मचाऱ्यांच्या संखेच्या बरोबरीनं AI एजंटांमार्फत काम करण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे कंपनीला पूर्वीएवढ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार नसल्याचं चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलंय.

हे कमी होतं की काय त्यात भर पडलीय ती मॅनपॉवर ग्रुपच्या ताज्या अहवालाची. मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणानुसार आता पुढच्या तीन महिन्यात कर्चमारी भरतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे...... या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या तर एकच चित्र समोर येतंय—ते म्हणजे, कंपन्यांनी आता नोकरभरतीला मोठा ब्रेक लावला आहे. या सगळ्यामागची कारणं काय आहेत, पाहूयात-

कर्मचारी भरती घटणार?

जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कंपन्यांची सावध भूमिका

जुलै ते सप्टेंबर तिमाहीत नोकरभरतीचा वेग मंदावणार

AI तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाच्या गरजांमध्ये बदल

सुरुवातीच्या पातळीवरील नोकऱ्यांची मागणी घटली

जागतिक पातळीवरील भू-राजकीय अस्थिरता आणि तंत्रज्ञानातले वेगवान बदल या दुहेरी कात्रीत तरुण अडकले आहेत. त्यामुळे नव तरुणांसाठी हा काळ संयमाचा आणि स्वतःची कौशल्ये अधिक अद्ययावत करण्याचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT