Crime Saam TV News
देश विदेश

Crime News: गाण्यावरुन शेजाऱ्यांमधे जोरदार भांडण, झाडाला बांधून बेदम मारहाण, मृतदेह २० किलो मिठात पुरला, अन्...

Man killed over music dispute: मोठ्या आवाजात गाणं वाजवल्याबद्दल एका शेजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. नंतर मृतदेह २० किलो मिठात पुरण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलंय.

Bhagyashree Kamble

मोठ्या आवाजात गाणं वाजवल्याबद्दल एका शेजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतलंय. ही धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. आधी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या केली. नंतर मृतदेह २० किलो मिठात पुरण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना अहमदाबादच्या चांदलोडियाच्या रणछोडनगरमध्ये घडली आहे. यात कमलेश याचा मृत्यू झाला आहे. कमलेश पत्नी प्रतिमा आणि मुलांसह राहत होता. १८ फेब्रुवारीला कमलेश कामावर गेला, परंतु घरी परतलाच नाही. यानंतर त्याच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत याची तक्रार दाखल केली.

प्रतिमा यांनी सांगितले की, महावीर शहा त्यांच्या पत्नी जागृतीसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू होता. मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि घरासमोर पाणी ओतण्यावरून वाद सुरू झाला होता. एसपी जयेश ब्रह्मभट्ट यांनी सांगितले की, माहिती मिळताच महावीर आणि जागृती यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली.

दोघांचेही फोन तपासण्यात आले. यादरम्यान, दोघांनी ऋषभ याला कॉल केला होता. ऋषभ हा कमलेश आणि महावीर यांचा मित्र होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर हत्यची माहिती समोर आली. एसपींनी सांगितले की, ऋषभने कमलेश आणि महावीरमधील भांडण सोडवण्यासाठी एका शेतात बोलावून घेतलं. या दरम्यान, महावीर यांची पत्नी आणि मित्र सुनील देखील उपस्थित होता. कमलेश आल्यानंतर त्याला बांधण्यात आलं आणि काठीनं मारायला सुरूवात केली.

यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर शेतात एक जागा तयार केली, आणि २० किलो मिठात कमलेश मृतदेह पुरलं. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलं. या घटनेचा तपास केला असता, अहमदाबाद पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतलं. एकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT