Ahmedabad Plane Crash update  Saam tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : मी विमानातून उडी मारली नाही, तर...; अपघातातून वाचलेल्या व्यक्तीने PM मोदींना काय सांगितलं?

Air India Plane Crash Update: विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी रमेश यांनी संपूर्ण घटनाक्रम पंतप्रधान मोदींना सांगितला.

Vishal Gangurde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील जखमींना भेट दिली. अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ घेताच झालेल्या विमान अपघातातून फक्त एकच व्यक्ती जिंवत वाचला. एका व्यक्ती सोडला तर विमानातील सर्व लोकांचा जळून कोळसा झाला. अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. मी विमानातून उडी मारली नाही, तर दुर्घटनेनंतर सीटसहित बाहेर फेकलो गेलो', असे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाचा गुरुवारी दुपारी १.३८ वाजता भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ घेताच दोन मिनिटात विमानाचा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकलं. या विमानातील २४२ लोकांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.

४० वर्षीय रमेश विश्वास कुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत. ते भारतातील कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते .ते विमानातील विमानाच्या ११ ए सीटवर बसले होते. तर त्यांचा भाऊ दुसऱ्या रांगेत बसला होता. घटनेच्या काही मिनिटानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अपघातानंतर रमेश विश्वास कुमार रक्तबंबाळ झाले होते.

रमेश विश्वास कुमार यांनी सांगितलं की, विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर ३० सेकंदातच मोठा स्फोट झाला. टेकऑफनंतर विमान हलायला लागलं. त्यानंतर काही सेकंदात विमानाचा अपघात झाला. मी स्फोटानंतर बेशुद्ध झालो. जाग आली त्यावेळी आजूबाजूला मृतदेहांचा खच पडलेला होत. मी कसंतरी उभा राहिलो. त्यानंतर पळू लागलो. काही लोकांनी रुग्णवाहिकेत बसवलं. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वास कुमार यांना धीर दिला. तसेच लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली. विश्वास यांची तब्येत आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विश्वास आता शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांतून जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT