Rajasthan Accident  saam tv
देश विदेश

Agra Accident: हृदयद्रावक घटना! लग्राला जाताना भीषण अपघात; नवरदेवाच्या भावासह ५ ठार

Agra Expressway Accident: आग्राच्या यमुना एक्स्प्रेसवेवर भरधाव कार डिवाडरला धडकून उलटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रत वाहनांमधील सर्व जण लग्न समारंभासाठी असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. २२ एप्रिल २०२४

आग्रामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आग्राच्या यमुना एक्स्प्रेसवेवर भरधाव कार डिवाडरला धडकून उलटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रत वाहनांमधील सर्व जण लग्न समारंभासाठी असताना ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आग्रा येथे कार दुभाजकाला धडकून पलटी होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले. गाडीमधील सर्वजण शनिवारी रात्री उशिरा लग्न समारंभासाठी ग्रेटर नोएडाहून बिहारमधील देवरियाला जात होते. याचवेळी एतमादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना एक्स्प्रेसवेवरील कुबेरपूर वळणावर भरधाव कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. दुर्घटनेतील जखमींना एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. गाडीचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नघरात शोककळा!

हा अपघात इतका भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. दरम्यान, या अपघातातील मृतांमध्ये नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे. रविवारी हा विवाह सोहळा पार पडणार होता. त्याआधीच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

SCROLL FOR NEXT