AGNIVEER NEW EXIT PLAN saam tv
देश विदेश

अग्निवीर सैनिकांनीसाठी 4 वर्ष पूर्ण होण्याच आत मिळणार नोकरी; कुठे मिळणार संधी?

Agniveer New Exit Plan Jobs Before Completing Four Years: अग्निवीरांसाठी केंद्र सरकार नवा एक्झिट प्लॅन तयार करत आहे. चार वर्षांची सैन्यसेवा पूर्ण होण्यापूर्वीच पुढील रोजगाराची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी असून CAPF, पोलीस, रेल्वे आणि इतर सरकारी विभागांमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून नवी व्यवस्था तयार करण्याची तयारी सुरू आहे. चार वर्षांची सैन्यसेवा पूर्ण होण्यापूर्वीच अग्निवीरांच्या पुढील रोजगाराचा मार्ग मोकळा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, अग्निवीरांसाठी नवा एक्झिट प्लॅन तयार करण्यात येत आहे. यामुळे सैन्यातील सेवा संपल्यानंतर नोकरीसाठी त्यांना पुन्हा सामोरे जावे लागू नये असा सरकारचा उद्देश आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात दाखल झालेल्या पहिल्या बॅचचा चार वर्षांचा कार्यकाळ जानेवारी 2027 मध्ये पूर्ण होणार आहे. या बॅचमध्ये 19 हजारांहून अधिक अग्निवीरांचा समावेश आहे. या अग्निवीरांची भरती 1 जानेवारी 2023 रोजी झाली होती.

25 टक्के अग्निवीर सैन्यातच राहणार

अग्निपथ योजनेनुसार चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित सैन्य सेवेत कायम ठेवण्याची तरतूद आहे. आता या अग्निवीरांची निवड प्रक्रिया त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अंतर्गत परीक्षा आणि कामगिरीच्या मूल्यांकनाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. निवड झालेल्या अग्निवीरांची यादी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे नियमित सैन्य सेवेत समावेश करताना कोणताही अंतर पडणार नाही.

यापूर्वी चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सर्व अग्निवीरांना सेवामुक्त केले जात होते आणि त्यानंतर 25 टक्के अग्निवीरांची पुन्हा सैन्यात निवड केली जात होती. आता ही प्रक्रिया बदलण्याची तयारी करण्यात येत आहे.

उर्वरित 75 टक्के अग्निवीरांसाठीही रोजगाराची तयारी

चार वर्षांनंतर सैन्यात नियमित सेवेसाठी निवड न झालेल्या 75 टक्के अग्निवीरांसाठीही रोजगाराची व्यवस्था करण्याची तयारी सरकारकडून केली जात आहे. केंद्रीय निमलष्करी दल, पोलीस आणि इतर सरकारी विभागांमध्ये त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यासाठी गृह मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष पोर्टल तयार करून भरती प्रक्रिया पुढे नेण्याची तयारी असल्याची माहिती आहे.

सरकारचा प्रयत्न असा आहे की अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांच्या पुढील सरकारी नोकरीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण व्हावी. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यानंतर रोजगारासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागू नये.

माजी अग्निवीरांसाठी अनेक केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. BSF, CRPF, CISF, ITBP आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल आणि रायफलमन पदांवर त्यांच्यासाठी 50 टक्के आरक्षण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत माजी अग्निवीरांना लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतही सवलत देण्याची तरतूद आहे.

रेल्वेतही आरक्षणाची तरतूद

अग्निवीरांसाठी भारतीय रेल्वेमध्येही आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅटेगरी-1 पदांवर माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के क्षैतिज आरक्षण, तर कॅटेगरी-2 आणि त्यावरील पदांवर 5 टक्के क्षैतिज आरक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवांमध्ये सेवामुक्त अग्निवीरांसाठी आरक्षण तसेच प्राधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

Weekly Horoscope: पुढचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार गेमचेंजर, तर काहींवर येणार मोठं संकट; वाचा तुमचं राशिभविष्य

Ratnagiri Village : कोकणातील 'हे' गाव पावसाळ्यात स्वर्ग दिसतं, जपलाय ४०० वर्षांचा वारसा

SCROLL FOR NEXT