Rahul Gandhi Agniveer Scheme:  Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi News: राहुल गांधींचा दावा खोटा! पंजाबमधील कुटुंबाला पोहोचली ९८ लाखांची मदत; लष्कराची माहिती

Rahul Gandhi Agniveer Scheme: अग्निवीर योजनेमध्ये शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत होत नाही. पंजाबमधील पिडीत कुटुंबाला १ कोटींची मदत मिळाली नाही, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले होते. मात्र राहुल गांधी यांचा हा दावा संरक्षण विभागाने खोडून काढला आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ४ जुलै २०२४

संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरुन पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. अग्निवीर योजनेमध्ये शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत होत नाही. पंजाबमधील पिडीत कुटुंबाला १ कोटींची मदत मिळाली नाही, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले होते. मात्र राहुल गांधी यांचा हा दावा संरक्षण विभागाने खोडून काढला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंजाबमधील शाहिद अग्निविर अजय सिंह यांच्या परिवाराला १ कोटींची मदत मिळाली नाही असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. याबाबत आता संरक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले असून राहुल गांधी यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

शहीद अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबाला एकूण रकमेपैकी 98.39 लाख रुपये आधीच दिले आहेत, असा दावा लष्कराने केला आहे. तसेच अग्निवीर योजनेच्या तरतुदींनुसार सुमारे 67 लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि इतर फायदे हे पोलीस पडताळणीनंतर लगेचच दिले जातील.एकूण रक्कम अंदाजे 1.65 कोटी रुपये असेल शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबियांना दिले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काल रात्री याबाबत एक व्हिडिओ ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. शहिद अजय सिंह यांच्या कुटुंबाला मदत न मिळाल्याचा दावा करत राजनाथ सिंह यांनी माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता संरक्षण विभागाने खुलासा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून युवकाची आत्महत्या

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT