Agniveer Recruitment Latest Updates
Agniveer Recruitment Latest Updates Saam TV
देश विदेश

Agniveer Recruitment: तरुणांसाठी आनंदाची बातमी, अग्निवीर भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल; लष्करी अधिकाऱ्यांची माहिती

Satish Daud

Agniveer Recruitment Latest Updates

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अग्निवीर भरतीप्रक्रियेत लवकरच मोठा बदल केला जाणार आहे. अग्निवीर प्रक्रियेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी कठीण निकष लावण्यात आला होते. मात्र, आता लवकरच हे निकष आणखी सोपे करण्यात येणार आहेत, यासंदर्भातील माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय सैन्यदलाकडून (Indian Army) देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन धोरण जारी होण्यापूर्वीच अग्निवीरच्या पहिल्या तुकडीने त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित युनिटमध्ये रुजू झाले आहेत. या सर्वांच्या पहिल्या वर्षाच्या पात्रतेचे मूल्यांकन जुन्या धोरणानुसार म्हणजेच कठीण निकषांनुसार करण्यात आले आहे.

अग्निवीरचे प्रथम वर्ष प्रशिक्षण केंद्रात आणि नंतर तीन वर्षांसाठी युनिटमध्ये मूल्यांकन केले जाणार आहे. अग्निवीरमध्ये भरती झालेल्या सैनिकाला ट्रेनिंगमध्ये 5000 फूट उंचीची 5 किलोमीटरची शर्यत 25 ते 28 मिनिटांत पूर्ण करावी लागते.

यामध्ये जो अग्निवीर सैनिक 23 मिनिटांत ही शर्यत पूर्ण करतो, तो सुपर उत्कृष्ट श्रेणीत येतो. आता सैनिकांनी 25 किंवा त्यापेक्षा कमी मिनिटांत शर्यत पूर्ण केली तर ते उत्कृष्ट असतील. 23 मिनिटांत शर्यत पूर्ण करण्यासाठी कोणतीही श्रेणी असणार नाही.

अग्निवीर सैनिकांची संपूर्ण तुकडी केवळ सुपर एक्सलंट निकषांवरून युनिटपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे त्याचे एक वर्षाचे मार्किंग झाले आहे. मात्र, अंतिम मार्किंगमध्ये ही दुरुस्ती केली जाईल, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर दुसऱ्या तुकडीपासून हे निकष लावण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT