Shraddha Walkar Saam TV
देश विदेश

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबची गूगल हिस्ट्री समोर, देशाला हादरवणारं अनुपमा गुलाटी हत्याकांड प्रकरण केलं होतं सर्च

आफताबने अनुपमा हत्याकांड प्रकरणाचा आधार श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आफताब पूनावालाच्या चौकशीतून समोर येणारे खुलासे मन सुन्न करणारे आहेत. आफताब श्रद्धाची हत्या केल्यानंतर जवळपास सहा महिने सामान्य जीवन जगत होता. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याने या दरम्यान काय काय केलं ही सर्व माहिती गोळा केली जात आहे. (Crime News)

आफताबने दरम्यान इंटरनेटवर काय सर्च केलं याची माहिती देखील पोलीस घेत आहेत. जेणेकरुन त्याच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं याचा अंदाज पोलिसांना येत आहे. आफताबच्या गूगल सर्च हिस्ट्रीमध्ये त्याने अनुपमा गुलाटी हत्याकांड प्रकरण सर्च केलं असल्याचं समोर आलं आहे. अनुपमा हत्याकांड आणि श्रद्धाची हत्या काही प्रमाणात समान आहे. त्यामुळे आफताबने अनुपमा हत्याकांड प्रकरणाचा आधार घेत श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा अंदाज पोलिसांना आहे. (Latest News Update)

काय आहे अनुपमा गुलाटी प्रकरण?

दिल्लीतील श्रद्धाच्या खून प्रकरणाने 12 वर्षांपूर्वीच्या अनुपमा गुलाटी खून प्रकरणाची आठवण झाली. 2010 मध्ये, दूनच्या शांत मैदानात, प्रेमविवाहाचा असा शेवट झाला की प्रत्येक ऐकणारे आणि पाहणारे सर्वच हादरले. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राजेश गुलाटीने भांडणानंतर पत्नी अनुपमा गुलाटीची हत्या केली होती. यानंतर मृतदेहाचे 72 तुकडे केले. अनुपमा पती राजेश गुलाटीसोबत डेहराडूनमधील प्रकाश नगर, कँट भागात राहत होती.

17 ऑक्टोबर 2010 रोजी घरात पत्नीची हत्या केल्यानंतर राजेशने स्टोन कटर आणि करवतीने मृतदेहाचे 72 तुकडे केले. यानंतर ते डीप फ्रीजरमध्ये लपवून ठेवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो रोज एका काळ्या पिशवीत एक तुकडा घेऊन जात असे. यानंतर तो ते तुकडे मसुरी रोडवरील जंगलात फेकत असे. आई दिल्लीला गेली असून काही दिवसांनी येईल असे तो आपल्या दोन्ही मुलांना सांगत असे. अनुपमाचा भाऊ सिद्धांत प्रधान दून येथे आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. 1 सप्टेंबर 2017 रोजी या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने राजेश गुलाटीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT