धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या व्यसनाने घेतला तरुणाचा जीव Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या व्यसनाने घेतला तरुणाचा जीव

या तरुणावर १० लाखाचे कर्ज झाले होते.

वृत्तसंस्था

राजगड - येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना राजगडमधील पडोनिया गावात घडली आहे. या तरुणावर १० लाखाचे कर्ज झाले होते. त्यामुळे या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचे लग्न झालेले असून त्याला दोन मुलं आहेत.

हे देखील पहा -

विनोद दांगी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विनोदचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. कुटुंबीयांचे दिलेल्या माहितीनुसार, विनोदला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. ऑनलाइन गेममध्ये तो तब्बल 10 लाख रुपये हरला होता. विनोद तब्बल महिनाभरापासून उदास आणि शांत राहू लागला होता. त्याला कर्ज फेडण्याची चिंता लागली होती. यानंतर त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातील सदस्यांनी त्याची ओळख पटवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : बड्या नेत्याने संपवलं आयुष्य; पक्षाच्या कार्यालयात आढळला मृतदेह, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: महाड MIDC तील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती, एका कामगाराचा मृत्यू

Monsoon skin itching: पावसाळ्यात त्वचेला खाज का येते?

Chanakya Niti: या 4 लोकांना तुमची कमाई आणि समस्या कधीही सांगू नका, चाणक्यांचा महत्त्वाचा सल्ला

Bhimashankar : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ? भीमाशंकरमधील आश्रमशाळेत सापांचा सुळसुळाट, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT