Hit And Run Accident x
देश विदेश

Accident : हिट अँड रनचा थरार! आधी तरुणाला उडवले, मग महिलेचा चिरडले; घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

Hit And Run Accident : सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चारचाकी कार एका तरुणाला आणि त्यानंतर एका महिलेला धडक देत असल्याचे दिसते.

Yash Shirke

  • थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

  • कारने तरुणाला, महिलेला उडवलं

  • कारचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु

Accident Video : सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका काळ्या रंगाच्या चारचाकी कारने एका तरुणाला आणि एका महिलेला चिरडल्याचे पाहायला मिळते. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. दोन्ही अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना बिहारच्या राजधानी पटनामध्ये घडल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघाताची घटना २ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली असल्याचे म्हटले जात आहे. एक काळ्या रंगाची एसयूव्ही पटनामधील बोरिंग रोडवरुन वेगाने जात होती. कारने समोर फोनवर बोलत चालत असलेल्या एका तरुणाला मागून धडक दिली. या कारने आणखी एका महिलेला चिरडल्याचेही म्हटले जात आहे. दोघेही रस्त्यावर जखमी होऊन पडले असताना कारचालक घटनास्थळाहून पळून गेला.

अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करुन पोलीस तपास करत आहेत. या फुटेजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कारने सुरुवातीला तरुणाला आणि नंतर महिलेला धडक देत चिरडल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते.

अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करुन पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. ती कार कोणाची आहे? याचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT