Jamner Accident Saam tv
देश विदेश

Accident : तंबाखू थुंकण्यासाठी धावत्या बसचे दार उघडले, बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

Uttar Pradesh (UP) Sultanpur Accident: तंबाखूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, पण त्याचे कारण कर्करोग किंवा ह्रदयविकार नाही तर चक्क अपघात आहे. या धक्कादायक घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सुलतानपूर : (Sultanpur Accident) तंबाखूमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे आपण अनेकदा ऐकतो, मात्र एका व्यक्तीचा तंबाखूमुळे ज्या प्रकारे अंत झाला ते वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू झाला पण त्याचे कारण कर्करोग किंवा ह्रदय विकार नाही तर चक्क अपघात होते. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एका प्रवाश्याने तंबाखू थुंकण्यासाठी चालत्या बसचे दार उघडले आणि खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

चालत्या बसचे दार उघडणे महागात पडले

शनिवारी तंबाखू थुंकण्यासाठी चालत्या बसचे गेट उघडणे यूपीच्या सुलतानपूरमध्ये एका प्रवाशाला महागात पडले. गेट उघडून तंबाखू थुंकत असताना त्याचा तोल गेला. तो चालत्या बसमधून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. बलदिराई पोलीस स्टेशन हद्दीतील बिही गावाजवळ पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. राम जियावान (58, रा. छत्रीक रोड, चिन्हाट, लखनौ) असे मृताचे नाव आहे. बस लखनौहून आझमगडला जात होती. अपघाताची माहिती मिळताच यूपीडीएचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. बसचालक हरिश्चंद्र तिवारी यांनी सांगितले की, प्रवाशाने तंबाखूचे सेवन केल्यानंतर थुंकण्यासाठी बसचा दरवाजा उघडला. तोल गेल्याने तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. उपनिरीक्षक रामदेव यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी सुरू केला घटनेचा तपास

बलदिराईचे एसएचओ धीरज कुमार यांनी सांगितले की, पीडितेचा मुलगा आणि सून पोलिस कॉन्स्टेबल आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई किंवा तपास नको असल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. तथापि, पोलिस प्राथमिक तपास करतील कारण अशा मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ही एक एसओपी आहे, असे एसएचओ म्हणाले. एसएचओने सांगितले की, प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे दिसते. ते म्हणाले की, आम्ही इतर प्रवाशांचेही जबाब घेतले आहेत. मृत हे शेतकरी होते. ते लखनौहून आझमगडमधील आपल्या गावी जात होते. 

Edited by- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT