Arvind Kejriwal On Congress ANI
देश विदेश

Delhi Breaking News : मोठी बातमी! दिल्लीचा नवा मुख्यमंत्री ठरला, विधिमंडळ पक्षनेतेपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब

Delhi New CM : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Satish Daud

राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आज आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी आतिशी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांचे नाव घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच आतिशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे दिल्लीला मंगळवारी नवा मुख्यमंत्री मिळणार आहे.

कथित दारू घोटाळ्यात म्हणजेच अबकारी धोरण प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांचे नाव समोर आल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात असतानाही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. मी सरकार चालवण्यास कटिबद्ध असल्याचं सांगत त्यांनी काही दिवस तुरुंगातूनच दिल्लीचा कारोभार सांभाळला.

केजरीवाल यांच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली होती. सत्तेची लालसा असलेल्या केजरीवालांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. दरम्यान, तुरुंगातून जामीवर सुटताच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रविवारी मोठी घोषणा केली. मी येत्या ४८ तासांत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

जोपर्यंत लोक मला 'प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र' देत नाहीत तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप आला. पुढचा मुख्यमंत्री नेमके कोण होणार? अशी चर्चा सर्वत्र रंगली. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, असं केजरीवाल यांनी सांगितलं होतं

आज यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आतिशी यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहे. याआधी त्या सरकारमधील बहुतांश मंत्रालये सांभाळत होत्या, त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत त्यांचा वरचष्मा मानला जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT