Assam Crime News Saam tv
देश विदेश

Assam case : 'तो गाडीतून उतरला, कॉन्स्टेबलच्या हातातून बेड्या खेचल्या अन्...'; पोलिसांनी सांगितलं आरोपी तलावात कसं बुडाला? VIDEO

Assam case update :पोलीस उपायुक्त म्हणाले, 'आरोपीला पोलिसांनी गाडीतून उतरवलं. त्यानंतर आरोपीला गाडीतून उतरवल्यानंतर त्याने पोलिसाच्या हातातील बेडी खेचली. आरोपीने तलावात उडी मारली. पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस त्याला वाचवण्यास अपयशी ठरले'.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आसामच्या नगांव जिल्ह्यातील धींग सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने तलावात उडी मारली. या आरोपीने तलावात उडी मारल्याने जीव गमावून बसला आहे. या आरोपीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपीचा मृत्यू कसा झाला, याविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

सामूहिक अत्याचार प्रकरणी आसाम पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. रात्री ११ वाजता पोलीस आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले. दुसऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी आरोपीला गाडीतून उतरवलं. आरोपी गाडीतून उतरला. त्यानंतर त्याने पोलिसांच्या हातातील बेडी खेचून तलावात उडी मारली. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी तलावात उडी मारली. मात्र, घटनास्थळी अंधार असल्याने पोलीस आरोपीला वाचवू शकले नाहीत.

'एनआयए'ने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त स्वप्निल डेका यांनी म्हटलं की, आरोपीने तलावात उडी मारल्यानंतर तातडीने एसडीआरएफ पथकाला बोलावलं. त्यानंतर सकाळी आरोपीचा मृतदेह तलावात आढळला. या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, आम्ही इतर आरोपींना लवकर अटक करू'.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, गुरुवारी सांयकाळी तिघांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. शिकवणीनंतर पीडित मुलगी सायकलवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपींनी पीडित मुलीला घेरलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिलाच तसंच सोडून फरार झाले. त्यानंतर स्थानिक लोकांना पीडित मुलगी तलावाजवळील एका रस्त्याच्या कोपऱ्याला जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली. स्थानिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.

पीटीआयच्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान गावात शनिवारी सकाळी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरोपीशी संबंधित तीन निर्णय घेतले. गावात एका ज्येष्ठ व्यक्तीने गावातील स्मशानभूमीत मृत आरोपीला दफन करण्याची परवानगी दिली नाही. तसेच आरोपीच्या अंत्यसंस्कारालाही न जाण्याचा निर्णय घेतला. गावातील ज्येष्ठांनी आरोपीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 'तरुणाच्या कृत्याने गावाची बदनामी झाली आहे. आम्ही त्याच्या मृतदेहाला स्मशानभूमीतही दफन करण्याची परवानगी देऊ इच्छित नाही. या घटनेच्या विरोधात आरोपीच्या गावातही निषेध मोर्चा काढण्यात आला, असे गावातील ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT