AAP Nominated Sanjay Singh Rajya Sabha Saam Digital
देश विदेश

AAP Nominated Sanjay Singh Rajya Sabha: तुरुंगात असलेल्या संजय सिंग यांना 'आप' पुन्हा राज्यसभेवर पाठवणार, कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

AAP Nominated Sanjay Singh Rajya Sabha: आम आदमी पक्षाने (आप) सध्या तुरुंगात असलेले खासदार संजय सिंह यांना पक्षाने पुन्हा एकता दिल्लीतील राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय सिंह यांची स्वाक्षरी आवश्यक असून परवानगीसाठी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता, त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Sandeep Gawade

AAP Nominated Sanjay Singh Rajya Sabha

आम आदमी पक्षाने (आप) सध्या तुरुंगात असलेले खासदार संजय सिंह यांना पक्षाने पुन्हा एकता दिल्लीतील राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय सिंह यांची स्वाक्षरी आवश्यक असून परवानगीसाठी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता, त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

संजय सिंह यांच्यासह दिल्लीतील ३ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २७ जानेवारी रोजी संपत आहे. १९ जानेवारीला खासदारांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेतून या वर्षी ६८ खासदार निवृत्त होणार आहेत. या जागांसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

२ जानेवारीला निवडणूक आयोगाने निवडणूक नामांकनासाठी नोटीस जारी केली होती. ९ जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. दरम्यान संजय सिंग यांच्या अर्जावर तिहार तुरुंग अधीक्षकांकडे कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी मागीतली होती. कोर्टाने तुरुंग अधीक्षकांना संजय सिंगच्या वकिलांना ६ जावेवारीला कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत राबवलेल्या मद्य धोरण प्रकरणात संजय सिंग यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. रद्द करण्यात आलेले अबकारी शुल्क धोरण राबवण्यात संजय सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. आर्थिक लाभाच्या बदल्यात काही मद्य व्यापारी, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांची मर्जी राखल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र संजय सिंग यांनी सर्व आरोपांचं खंडण केलं असून सध्या ते तुरुंगात आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT