AAP MLA Gurpreet Gogi's Death Under Investigation 
देश विदेश

खळबळजनक! बायका-पोरं घरात, आमदाराने स्वत:वर झाडली गोळी, आयुष्य संपवलं

AAP MLA Gurpreet Gogi's Death Under Investigation : आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आमदाराने आपल्या लायसन्स रिवॉल्वरने गोळी मारुन आपलं आयुष्य संपवल्याचे बोलले जातेय.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

AAP MLA Gurpreet Gogi's Death News : राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेय. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आप पक्षाला मोठा झटका बसलाय. पंजाबमधील आमदार गरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झालाय. बायको-मुलं घरात असताना गोगी यांनी स्वत:वर गोळी झाडली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, बंदूक साफ कराताना गोगी यांना गोळी लागल्याचे समजतेय. पोलीस तपास करत आहेत. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे (AAP) आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. गोगी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'आप'च्या आमदाराचा मृत्यू कसा झाला, अचानक गोळी कशी लागली? त्यांनी 'स्वतःवर' गोळी झाडली की दुसऱ्याने गोळी झाडली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. गोगी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

डीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी आप आमदाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, 'त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. ही घटना रात्री 12 वाजता घडली.' पोलिस आयुक्त कुलदीप चहल आणि उपायुक्त जितेंद्र जोरवाल हे डीएमसीएचमध्ये उपस्थित आहेत. आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे.

मध्यरात्री नेमकं काय झालं?

गुरप्रीत गोगी यांनी मध्यरात्री 12 वाजता स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले गेलेत. गुरप्रीत गोगी शुक्रवारी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. त्यानंतर जेवण करून आपल्या खोलीत गेले. त्यानंतर थोड्यावेळात खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. आवाज ऐकताच त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे धावल्या. खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसले, हे पहिल्यानंतर पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोगी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT