Bansuri Swaraj Saam Tv
देश विदेश

Bansuri Swaraj: भाजप खासदार बांसुरी स्वराज यांची खासदारकी धोक्यात? आप नेत्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, काय आहे प्रकरण?

Aap Leader Somnath Bharti Appeal Delhi High Court: भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याप्रकरणी २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्या खासदारकीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलंय. आप नेते सोमनाथ भारती यांनी याचिका दाखल केलीय. निवडणुकीत गैरव्यवहार केला, असं म्हणत त्यांनी याचिका दाखल केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय लवकरच सुनावणी घेईल, अशी शक्यता वर्तविली जातेय.

आप नेते सोमनाथ भारती यांनी शनिवारी २० जूलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात कथित भ्रष्ट कारभाराचे आरोप करत (Aap Leader Somnath Bharti) भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्या खासदारकीला आव्हान दिलंय. न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा २२ जुलै रोजी निवडणूक याचिकेवर सुनावणी करणार आहेत. याचिकेत म्हटलंय की, रिटर्निंग ऑफिसरच्या म्हणण्यानुसार, भारती यांना ३,७४,८१५ मते मिळाली होती, तर बांसुरी स्वराज यांना ४,५३,१८५ मते मिळाली. या दोघांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नवी दिल्ली मतदारसंघातून स्वराज यांना विजयी घोषित करण्यात आलं.

याचिकेत म्हटलंय की, ही याचिका याचिकाकर्ते सोमनाथ भारती यांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८० आणि ८१ अंतर्गत दाखल केलीय. बांसुरी स्वराज यांना मदत करण्यासाठी आम आदमी पक्षाचे माजी मंत्री राज कुमार आनंद यांना प्रत्यक्षात भारती यांच्याविरोधात उभे केले होते, असा आरोप याचिकेत करण्यात (BJP MP Bansuri Swaraj) आलाय. मात्र, राजकुमार आनंद हे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार होते.

त्यात म्हटले आहे की, राज कुमार आनंद दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते. ९ एप्रिलपर्यंत ते भारती यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्यांनी १० एप्रिल रोजी त्यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिला (Lok Sabha) होता. या याचिकेत आरोप करण्यात आलाय की, स्वराज यांना मतांची टक्केवारी कमी करून मदत करण्यासाठी आनंद यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. नंतर १० जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.

याचिकेत दावा करण्यात आलाय की, निवडणुकीच्या दिवशी बांसुरी स्वराज यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील विविध बूथला भेट दिली होती. मतदानासाठी बूथवर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना एजंट बांसुरी स्वराज यांचा फोटो, निवडणूक चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवत होते. ते स्वराज यांना मतदान करण्यासाठी मतदारांना सांगत असल्याचा आरोप याचिकेमध्ये (Delhi High Court) केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT