Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: 'अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचा चेहरा असायला हवेत'; 'इंडिया'च्या बैठकीआधीच 'आप'ने व्यक्त केली इच्छा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचा चेहरा असायला हवेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

Poliitical News In Marathi:

विरोधकांच्या 'इंडिया'ची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधीच विरोधकांच्या 'इंडिया'ने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचा चेहरा असायला हवेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

'आप'च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी देशाच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. प्रियंका कक्कर म्हणाल्या, 'देशात महागाई गगनाला भिडली असतानाही राजधानी दिल्लीत मात्र कमी महागाई आहे'.

'राजधानी दिल्लीत मोफत पाणी, मोफत शिक्षण, मोफत वीज, महिलांना मोफत बस प्रवास, वृ्द्धांसाठी मोफत तीर्थयात्रा या सुविधा आहेत. तरीसुद्धा दिल्लीत सरप्लस बजेट सादर करण्यात आला. ते लोकांचे प्रश्न हाती घेतात. तसेच ते सत्ताधाऱ्यांना एक तगडं आव्हान देत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुंबईत विरोधकांच्या 'इंडिया'च्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधकांचे सर्व प्रमुख नेते सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास बैठकीस हजर राहणार आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्वांसाठी भोजनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत मुंबईत २६ राजकीय पक्ष सामील होणार आहेत.

तत्पूर्वी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या विरोधात देशातील सर्व विरोधकांना एकत्र करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.

रविवारी नितीश कुमार यांनी सांगितले की, 'इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत आगामी रणनीतीवर चर्चा होईल. तसेच जागावाटपाच्या चर्चांवरही चर्चा होईल. तसेच काही राजकीय पक्षही या आघाडीत सामील होणार आहेत. मला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक पक्ष एकत्र करायचे आहेत. त्याच दिशेने माझं काम सुरू आहे. मला कोणतंही पद नकोय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

SCROLL FOR NEXT