Aadhar Card Saam Tv
देश विदेश

Aadhar Card Update | तुमचे आधार कार्ड बनवा सुपर स्ट्राँग, वाचा काय आहे ट्रिक

आधार वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने केला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: सध्याच्या युगात आधार कार्ड (Aadhar Card) हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता आधारकार्डशी तुमचे रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रेही लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्डची गरज वाढल्याने त्याचा गैरवापरही होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार लोकांच्या आधारचा गैरवापर करून केवळ आर्थिक फसवणूक करत नाहीत तर काही गुन्हेगारी कृत्यांमध्येही त्याचा वापर करत आहेत.

आधार वापरकर्त्यांची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) केला आहे. तरीही काही लोकांच्या आधारचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. ही प्रकरणे वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.

डेटा सुरक्षा तज्ञ यांच्या मतानुसार, आधार वापरकर्त्यांनी सतर्क राहताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

आधार कार्डचा गैरवापर रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल त्याच्याशी लिंक करणे. हे केल्यास तुम्हाला वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी आवश्यक येणार आहे. ते आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येईल. OTP शिवाय आधारची पडताळणी करता येत नाही. अशा प्रकारे आधारचा (Aadhar Card) गैरवापर टाळता येईल.

आधार कार्डची (Aadhar Card) कॉपी देणे आवश्यक असल्यास मास्कड आधारकार्डची छायाप्रत द्यावी लागणार आहे. मास्क केलेल्या आधारमध्ये संपूर्ण आधार क्रमांक नसून फक्त शेवटचे चार अंक असतात. याच्या मदतीने आधार पडताळणी केली जाते.

बायोमेट्रिक्स लॉक ठेवा

तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करून तुमचे आधार सुरक्षित करू शकता. बायोमेट्रिक लॉक म्हणजे अंगठांचे ठसे तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही वापरू शकत नाही. UIDAI वेबसाइटला भेट देऊन कोणीही त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकतात. बायोमेट्रिक्स लॉक झाल्यानंतरही ओटीपी आधारित प्रमाणीकरण सुरू राहते. बायोमेट्रिक्स तात्पुरते किंवा कायमचे लॉक केले जाऊ शकतात.

आधार क्रमांक व्हर्च्युअल आयडेंटिटी (VID) मध्ये लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये वापरकर्त्याचा आधार क्रमांक जाहीर केला नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. व्हीआयडी केवळ अल्प कालावधीसाठी वैध आहे. आधार पोर्टल किंवा एम-आधारवरून व्हर्च्युअल आयडेंटिटी मिळवता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू होणार

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT