Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: चक्क विमानात दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी; थरारक व्हिडिओ व्हायरल...

थायलंडची राजधानी बॅंकॉकहून कोलकत्याच्या दिशेने थाय स्माइल एअरवेज हे विमान निघालं होतं, यात दोन भारतीय प्रवासी अतीशय शुल्लक कारणावरून भांडू लागले.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: आजवर तुम्ही ट्रेनमध्ये अनेक व्यक्तींना भांडताना पाहिलं असेल. यात जास्त करून गर्दीच्या वेळी धक्का लागल्याने भांडण होतं असतं. यात अनेकदा व्यक्ती रागाच्याभरात एकमेकांना शिवीगाळही करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ ट्रेन किंवा रस्त्यावरचा नाही तर चक्क आकाशात उडणाऱ्या विमानातला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलिच चर्चा रंगली आहे. (Latets Viral News)

भांडण करणे, शिव्या देणे ही सर्व असभ्यपणाची लक्षणे असल्याचे म्हटले जाते. दोन व्यक्तींमधील ट्रेनमधली भांडण पाहून तिसरा व्यक्ती सहज बोलतो की, हे काय अडाणी लोक आहेत. अशात विमाने प्रवास करताना कोणतीही धक्काबुक्की होत नाही. सर्व चांगल्या सुविधा असतात. मग तरी देखील या दोन व्यक्तींमध्ये नेमकी कोणत्या कारणावरून भांडणं सुरू झाली असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडची राजधानी बॅंकॉकहून कोलकत्याच्या दिशेने थाय स्माइल एअरवेज हे विमान निघालं होतं. यात दोन भारतीय प्रवासी अतीशय शुल्लक कारणावरून भांडू लागले. दोघांचे वाद इतके वाढले की, त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी उपस्थित व्यक्तींनी त्या दोघांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला आहे.

यावेळी फ्लाइट अटेंडेंट आणि कॅबीन क्रू भांडण सोडवण्यासाठी आले होते. मात्र दोन्ही व्यक्ती ऐकण्यास तयार नव्हत्या त्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय थाय स्माइल एअरवेज विमान कंपनीच्या वरिष्ठांनी घेतला आहे. या विमानात भारतीय प्रवासी होते. तसेच विमान भारतात दाखल होणार होते अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे.

यात दोन्ही व्यक्ती चालत्या विमानात एकमेकांना मारहाण करत असल्याचे पाहून इतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात एकच गोंधळ निर्माण झाला. दोन व्यक्तींच्या भांडणाचा इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Rice Benefits: दूध भात खाण्याचे फायदे काय?

Garlic pickle: घरच्या घरी तयार करा लसणाचे स्वादिष्ट लोणचे

ICC Cricket: पाकिस्तानच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती, 'या' ६ फलंदाजाला खातेही उघडता आले नाही, कोणत्या संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम?

Blood Sugar Level Tips: औषधांशिवाय ब्लड शुगर लेवल कमी करायचीये? घरच्या घरी करा सोपे उपाय

KL Rahul Wicket: अर्रर्रर्रर्र....! चेंडू सोडला अन् बेल्स उडाल्या, केएल राहुलची विचित्र विकेट

SCROLL FOR NEXT