8 dead, 26 injured in road accident in Karnataka's Hubli संभाजी थोरात
देश विदेश

Karnataka Road Accident: हुबळीमध्ये भीषण अपघात; ८ जण जागीच ठार, ६ महाराष्ट्रातले

Road Accident in Karnatakas Hubli : मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश आहेत. तर ६ जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते.

संभाजी थोरात, कोल्हापूर

हुबळी, कर्नाटक : हुबळी-धारवाडच्या तरीहाळा (Tarihal bypass) बायपासवर (Hubballi Dharwad Bypass) भीषण अपघात झाला आहे. यात लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर जोरादार धडक झाली आहे. या अपघातात (Accident) ८ जण ठार जागीच ठार झाले आहेत तर २६ जण गंभीर जखमी आहेत, मृतांमध्ये कर्नाटकातील (Karnataka) दोघांचा समावेश आहेत. तर ६ जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते. अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (8 dead, 26 injured in road accident in Karnataka's Hubli)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार एक खाजगी प्रवासी बस ही कोल्हापूरहून बंगळूरकडे निघाली होती. याच प्रवासी बसची आणि एका लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी या अपघाताबाबत एफआयआर नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे.

आठवड्याभरातली दुसरी घटना

असाच भीषण अपघात हा तीन दिवसांपुर्वी (२१ मे) ला झाला होता. शनिवारी (२१ मे) ला पहाटे कर्नाटकातील (Karnataka) धारवाड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. क्रुझरमधून लग्नावरुन गावी परत जात असताना हा अपघात (Accident) झाला. या क्रुझरमधून २१ जण प्रवास करत होते. यातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT