Uttar Pradesh Pistol Viral Video Saam Tv
देश विदेश

शिक्षिकेनं कमरेला खोचलं होतं गावठी पिस्तुल; झडतीनंतर पोलीसही हादरले

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे काल एका शिक्षिकेला देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

साम वृत्तसंथा

मैनपुरी: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मैनपुरीमध्ये काल एका शिक्षिकेला देशी बनावटीचे पिस्तुल जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. करिश्मा सिंह यादव अस या शिक्षिकेचं नाव आहे. त्या फिरोजादाबाद येथील एका शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षिका काल काही कामासाठी मैनपुरी येथे होत्या. यावेळी पोलिसांना त्यांच्याजवळ पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी (Police) त्यांची चौकशी करुन त्यांच्या जवळ असलेली पिस्तुल जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, या महिलेजवळ पिस्तुल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही या महिलेचा पत्ता शोधला. यानंतर त्या महिलेची चौकशी केल्यावर समजले त्या शिक्षिका आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे पिस्तुल मिळाले.

हे देखील पहा

या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला पोलीस त्या शिक्षिकेची झडती घेत आहे. गर्दीच्या ठिकाणी हा तपास सुरु असल्याचे दिसत आहे. झडतीदरम्यान महिला शिक्षिकेच्या खिशातून ३१५ बोअरचे देशी बनावटीचे पिस्तुल सापडले असल्याचे दिसत आहे.

शिक्षिकेजवळ देशी पिस्तुल सापडल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षिका करिश्मा सिंह यादव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिका शस्त्र का जवळ बाळगत होत्या याची चौकशी पोलीस करत आहेत.

एका शिक्षिकेने पिस्तुल जवळ बाळगल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. ही पिस्तुल नेमकी आणली कुठून, कशासाठी आणली होती. या पाठिमागे काही घातपात होता का याचा तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Elections : भारतात जन्मले, अमेरिकी निवडणुकीत ठरले किंग; राजा कृष्णमूर्ती सलग दुसऱ्यांदा जिंकले!

Maharashtra News Live Updates : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना अश्रू अनावर

Girls Like Married Men: मुलींना लग्न झालेले पुरूष का आवडतात?

Pune News : पुण्यात विजयासाठी महायुतीची रणनीती ठरली; मित्र पक्षाला एकत्र घेत बांधली समन्वयाची मोट

IPL 2025 Auction: कोण मालामाल होणार! पंत, राहुल ते अय्यर; भारताच्या 'या' खेळाडूंची बेस प्राईज सर्वाधिक

SCROLL FOR NEXT