95 Year Old Man Marriage Saam Tv
देश विदेश

95 Year Old Man Marriage : उतावळे आजोबा गुडघ्याला बाशिंग; ११ मुलं आणि ३४ नातवंड, तरीही दुसऱ्यांदा केलंय लग्न

95 Year Old Man Second Marriage : वयाच्या ९५ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा लग्नाचा थाट घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pakistan News : आयुष्यात प्रत्येकालाच जोडीदाराची गरज असते. पती-पत्नीच्या नात्यात कितीही भांडणं झाली तरी ते प्रेमाने एकमेकांशी जुळवून घेतात. अशात आपल्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि जिवलग पत्नी कायमची निघून गेली तर? ही कल्पना सुद्धा मनाला वेदना देते. घटस्फोट किंवा जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर अनेक व्यक्ती दुसऱ्या लग्नाचा विचार करतात. अशात पाकिस्तनातून डोकं चक्रावणारी एक घटना समोर आली आहे.

दुसऱ्यांदा लग्न झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. लग्नासाठी आणि प्रेमासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं असं म्हणतात. अशात पाकिस्तानातील एका आजोबांना वयाच्या ८४ व्या वर्षी पत्नीचा विरह सहन करावा लागला. पत्नीत्या निधनानंतर आजोबा पुरते एकटे पडले. पत्नीचा मृत्यू होऊन १० वर्षांचा काळ लोटला. आजोबांना हा एकटेपणा सहन होईना. त्यामुळे त्यांनी मला पुन्हा लग्न करायचं असा हट्ट धरला.

वयाच्या ९५ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा लग्नाचा थाट घातला आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये ही घटना घडली आहे. मोहम्मद झकेरिया असे या वृद्ध आजोबांचे नाव आहे. त्यांचे वय ९५ वर्षे असून पहिल्या पत्नीकडून त्यांना ७ मुलं आणि ५ मुली आहेत. तसेच नातवंड आणि पतवंडाची संख्या ९०च्या घरात आहे.

मुलानेच शोधली आपली दुसरी आई

बायकोच्या निधनानंतर ११ वर्षांनी आजोबांनी दुसरं लग्न केले आहे. दुसऱ्या लग्नासाठी झकेरियांनी मुलाकडे हट्ट धरला होता. वडिलांच्या आग्रहासाठी त्यांच्या मुलानेच वडिलांचे ९५ व्या वर्षी लग्न लावून दिले आहे.

उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या मानसोहरा शहरात राहणाऱ्या झकारियांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला त्यांची ११ मुले आणि ३४ नातवंड उपस्थित होते. वडिलांनी पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मुलानेच मुलीचा शोध घेतला आणि वडिलांचे लग्न लावून दिले. ९५ व्या वर्षी लग्न करणाऱ्या या आजोबांची पाकिस्तानात चांगलीच चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT