Gujarat News Saam TV
देश विदेश

Gujarat News: अहमदाबादमधील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग; एका चिमुकलीचा मृत्यू

एका चिमुकलीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gujarat News: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबाद येथील शाहीबाग परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अनेक व्यक्ती आगीत आडकल्या आहेत तसचे एका चिमुकलीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका १५ वर्षीय मुलीचा यात मृत्यू झाला आहे. ही मुलगी घरी एकटीच होती. घरातील इतर सदस्य बाहेर गेले असताना ही घटना घडली. अशात आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातव्या मजल्यावर आग लागल्यानंतर ही आग आणखीन वरती पसरत चालली आहे. त्यामुळे वरच्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप खाली आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT