Nainital Forest Fire :
Nainital Forest Fire : Saam tv
देश विदेश

Nainital Forest Fire : नैनीतालच्या जंगलामध्ये भीषण आग; लोकवस्तीजवळ लागलेली आग विझविण्यासाठी लष्कराला पाचारण

Vishal Gangurde

उत्तरांखड : उत्तराखंडच्या जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नैलीतालजवळील भवाली रोडजवळील जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जंगलाचा मोठा भाग हा आगीच्या कचाट्यात सापडला आहे. त्यात आयटीआय भवन देखील आहे. या आगीमुळे परिसराचे धुराचे लोट पसरले आहेत.

अग्निशमन दलाला जंगल परिसरात हवेच्या वेगामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड होऊ लागलं आहे. नैनितालजवळ लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्काराला पाचारण करण्यात आलं आहे. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्काराचे जवान पुढे सरसावले आहेत.

शुक्रवारी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नैलीताल आणि भीमतालमध्ये पाण्याने विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नैनीतालच्या बलदियाखान, ज्योलिकोट, मंगोली, खुरपाताल, देवीधुरा, भवाली, पाईनस,भीमताल मुक्तेश्वर सहित आजूबाजूच्या जंगल परिसरात आग धुमसत आहे.

दरम्यान, वन विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कुमाऊ क्षेत्रात जंगलाला आग लागण्याच्या २६ घटना घडल्या आहेत. गढवास क्षेत्रातही पाच घटना घडल्या आहेत. तर या आगीमुळे ३३.३४ हेक्टर वन क्षेत्र प्रभावित झालं आहे.

गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी आतापर्यंत जंगलात आग लागण्याच्या ५७५ घटना घडल्या आहेत. या आगीत ६८९.८९ क्षेत्र प्रभावित झालं. यामुळे राज्याचे १४ लाखांचं नुकसान झालं. तर जखोली आणि रुद्रपयागच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जंगलाला आग लावण्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मतदान केंद्रात शांतिगिरी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप; पोलिसांकडून तातडीने कारवाई

Dombivali News : डोंबिवलीत EVM मशीन बंद, मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण

Mumbai Lok Sabha Voting Live : मुंबईत मोठा गोंधळ, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Abhishek Sharma Record: विराटवर अभिषेक शर्मा पडला भारी! मोडून काढला किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड

Sinhagad Fort Pune: सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT