लग्न SaamTV
देश विदेश

Marriage : अबब..! 10 मुलांच्या बापाने 20 वर्ष लहान मुलीशी केलं लग्न, न्यायालयाने दिला हा अजब निर्णय

Haryana news : सुरक्षा देण्याऐवजी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नूह (हरियाणा) : हरियाणाच्या नूह जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण उघड झाले आहे. एका विवाहित जोडप्याला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे संरक्षण मागणे चांगलेच महागात पडले आहे. एका 10 मुलांच्या बापाने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांनी सुरक्षेची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्याला सुरक्षा देण्याऐवजी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड पीजीआय गरीब निधीमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आला आहे. अनेक तथ्ये जाणूनबुजून लपवून या जोडप्याने संरक्षण मागितल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या जोडप्याला कोणी धमकी दिली हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नूह येथे राहणाऱ्या एका मुस्लिम प्रेमी जोडप्याने आपल्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्यायाचे कारण देत न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, वराकडे 40 एकर जमीन आहे. तो मेकॅनिक असून 55 हजार रुपये कमावतो. तो आधीच विवाहित असून त्याला 10 मुले असल्याचेही सांगण्यात आले. आता त्याने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न केले आहे.

मुलीच्या आधारकार्डवर उपस्थित झाले प्रश्न

न्यायालयात याचिका दाखल करताना आधारकार्ड जोडावे लागते, मात्र याचिकेत मुलीची ओळख पटू नये अशा पद्धतीने मुलीचे आधार कार्ड जोडण्यात आले होते. आधार कार्डची प्रत जोडलेली होती ती अतिशय गडद होती, त्यात मुलीचा फोटो पूर्णपणे काळ्या रंगाचा दिसत होता. न्यायालयाने म्हटले की, रेकॉर्डवर ठेवलेल्या आधार कार्डचे अवलोकन केल्यावर ते पूर्णपणे अस्पष्ट असल्याचे दिसून येते आणि महिला याचिकाकर्त्याची ओळख लपविण्यासाठी हे जाणूनबुजून केलेले कृत्य असल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

Arjun Kapoor: समांथाच्या कवितेवर अर्जुन कपूरची हटके रिॲक्शन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT